Download App

ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य दडवलं जातंय…; कोलकाता हत्याप्रकरणावरून भाजपचा आरोप

मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभ्या आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे- भाजप प्रवक्ते गौरव भाटिया

  • Written By: Last Updated:

Kolkata doctor rape-murder case : कोलकाता येथील रजी कर रुग्णालयात (RG Kar Hospital एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने सगळा देश हादरला आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. आता भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य सरकार या घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप भाजपने केला.

रामदासभाईंचा जाळ आणि चव्हाण यांचा धूर : कोकणात महायुती का पेटली? 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभ्या आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. सरकार या प्रकरणातील सत्य लपवण्यात व्यस्त आहे. या घटनेचा तपास तातडीने सीबीआयकडे का सोपवण्यात आला नाही?, असा सवाल भाटीया यांनी केला.

Amir Khan बॉलिवूडला करणार रामराम? रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये कोसळलं रडू 

मुख्यमंत्री या घटनेबाबत मोर्चा काढत आहेत, याचा अर्थ बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आली आहे, असा सर्वसाधारण लोकांचा समज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाटिया यांनी केला.

ते म्हणाले, हत्येच्या घटनेनंतर महत्वाच्या 48 तासांत तपासाला विलंब झाला. हे प्रकरण तातडीने सीबीआयकडे का वर्ग करण्यात आले नाही? पश्चिम बंगाल पोलीस पीडितेच्या कुटुंबाशी खोटे का बोलत होते? कुटुंबियांना हॉस्पिटलमधून फोन येतो, तुमची मुलगी आजारी आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर कुटुंबीयांनी फोन केला असता तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलंय… कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा 24 तास मृतदेह कुटुंबीयांना दाखवण्यात आला नाही. यावेळी घटनेशी संबंधित कोणते पुरावे नष्ट केले जात होते?, असा सवालही भाटिया यांनी केला.

दरम्यान, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित डॉक्टर तरुणीची ओळख उघड केल्याबद्दल 23 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. कीर्ती शर्मा असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.

follow us