Download App

‘1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये इंदिरा गांधींचा ब्रिटनला पाठिंबा; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा…

MP Nishikant Dubey Claim Indira Gandhi Supported Britain : भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी 1984 च्या सुवर्ण मंदिर हल्ल्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ब्रिटनच्या सहकार्याने सुवर्ण मंदिरावर हल्ला केला होता. भाजप नेत्याने (Nishikant Dubey) त्यांच्या एक्स हँडलवरील गृहसचिवांच्या कथित अहवालाचा हवाला देत लिहिले आहे की, 1984 मध्ये सुवर्ण मंदिरावर हल्ला ब्रिटनच्या सहकार्याने करण्यात आला होता. ब्रिटीश सैन्य अधिकारी अमृतसरमध्ये उपस्थित होते. शीख समुदाय हा काँग्रेससाठी (Congress) फक्त एक खेळण्यासारखा आहे.

पाकिस्तानला देण्याचा करार

त्यांनी असाही दावा केला की, सरदार स्वर्ण सिंग यांनी 1960 मध्ये करतारपूर साहिब पाकिस्तानला देण्याचा करार केला होता, 1984 मध्ये शीखांचा नरसंहार लपविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाचवण्यात आले. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना ‘कठपुतळी पंतप्रधान’ बनवण्यात आलं होतं, अशी टीका देखील खासदार दुबेंनी केली आहे.

गुन्हेगारी वाढली, कुशल सरकारी वकिलांची आवश्यकता; जाधवर ग्रुप देणार सरकारी वकील होण्यासाठी प्रशिक्षण

1984 च्या सुवर्ण मंदिर हल्ल्याबाबत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक खळबळजनक दावा केलाय. त्यांनी म्हटलंय की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ब्रिटनशी संगनमत करून सुवर्ण मंदिरावर हल्ला केला होता.

हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना आव्हान

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादात सुद्धा वाढ केली आहे. त्यांनी हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांना खुले आव्हान दिलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून टाका. महाराष्ट्रात सुरू असलेला भाषा वाद काही संपत नाहीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदीविरुद्ध एकत्र आले आहेत.

Video : मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा; मराठी इन्फ्लुएन्सरला केली शिवीगाळ

निशिकांत दुबे यांच्याव्यतिरिक्त, इतर भाजप नेत्यांनीही हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. मंत्री नितेश राणे यांनी उर्दू भाषिकांना हिंदीत बोलण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर त्यांनी ठाकरे बंधूंवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोपही केला होता.

follow us