Download App

ब्रेकिंग! आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; 5,590 कोटींचा घोटाळा…

ED Raid On AAP Leader Saurabh Bhardwaj House : मंगळवारी सकाळी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज (AAP Leader Saurabh Bhardwaj) यांच्या घरावर ईडीने छापा (ED Raid) टाकला. ही कारवाई रुग्णालय बांधकाम घोटाळ्याशी संबंधित (Breaking News) असून, या प्रकल्पाचा एकूण अंदाज सुमारे 5,590 कोटी रुपयांचा आहे.

प्रकल्पाचा आढावा

2018-19 मध्ये दिल्ली सरकारने 24 रुग्णालयांच्या बांधकामासाठी 5,590 कोटी रुपये मंजूर केले. या प्रकल्पांत ICU रुग्णालये 6 महिन्यांत पूर्ण होण्याचे ठरले होते; मात्र 3 वर्षांनंतरही काम अपूर्ण आहे. अनेक प्रकल्पांमध्ये गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत.

‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित! 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

आरोप काय आहेत?

– बहुतेक प्रकल्प 3 वर्षांनंतरही अपूर्ण राहिले, जरी सुरुवातीला 6 महिन्यांत पूर्ण करण्याचा कार्यक्रम होता.
– 800 कोटी रुपयांचा खर्च असूनही केवळ 50 % काम पूर्ण झाले.
– एलएनजेपी रुग्णालयाचा खर्च 488 कोटी रुपयांवरून 1,135 कोटी रुपयांपर्यंत वाढला, तरी कोणतीही ठोस प्रगती नोंदवली गेली नाही.
– अनेक ठिकाणी मंजुरीशिवाय बांधकाम सुरू केले गेले; कंत्राटदारांच्या भूमिकेवर शंका.
– HIMS (Hospital Information Management System) 2016 पासून प्रलंबित; जाणूनबुजून विलंब झाल्याचा आरोप आहे.

गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका! मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा संताप, सोशल मीडियावर पोस्टची चर्चा

चौकशी आणि ईसीआयआर

या प्रकरणात माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांची चौकशी सुरू आहे. ईडीने यासंदर्भात ECIR दाखल केले असून, जूनमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने एसीबीला या रुग्णालय प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी करण्यास परवानगी दिली होती.

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांची भूमिका

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यांनी दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आणि तत्कालीन आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज व सत्येंद्र जैन यांचा सहभाग असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे दिल्लीत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, रुग्णालय बांधकाम प्रकल्पातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

follow us