Download App

Breaking News : बीबीसीच्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयावर छापेमारी

  • Written By: Last Updated:

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्लीतील ऑफिसवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात 60-70 लोकांची टीम दाखल झाली आहे.

बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही आवारात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी नाही. दरम्यान आयकर विभागाकडून हा छापा नसून हे सर्वेक्षण आहे.

आयकर विभागाकडे तक्रार झालेल्या तक्रारीनुसार हे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी बीबीसीने २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट प्रसारित केला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. केंद्र सरकारने २१ जानेवारी रोजी या डॉक्युमेंटरीची लिंक शेअर करणाऱ्या युट्युब आणि ट्विटरच्या लिंक ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीसही बजावली होती. त्यानंतर २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटाच्या प्रसारणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) आणि बीबीसी इंडियावर भारतीय हद्दीतून काम करण्यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. .

(बातमी अडपेट होत आहे.)

Tags

follow us