Brij Bhushan Sharan Singh : पुढील सुनावणीपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अंतरिम जामीन…

Brij Bhushan Sharan Singh : कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या तारखेपर्यंत सिंह यांना दिलासा मिळालायं. ‘गदर’ स्टोरीत […]

Brijbhushan

Brijbhushan singh

Brij Bhushan Sharan Singh : कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या तारखेपर्यंत सिंह यांना दिलासा मिळालायं.

‘गदर’ स्टोरीत ट्विस्ट! सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात, चौकशीत धक्कादायक खुलासे?

सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणी कडक कारवाई होण्यासाठी महिला कुस्तीपटू विघ्नेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह इतर खेळाडूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केलं होतं. खेळाडूंचं हे आंदोलन देशभरात गाजलं होतं. या आंदोलनाची दखल आणि कोणतीही कारवाई होत नसल्याने सत्ताधारी सरकारविरोधात नागरिकांमधून संतापाची लाट उसळली होती.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांचं आरोपपत्र दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक करण्यात आली नाही, याचा अर्थ त्यांच्याविरुद्ध असे कोणतेही पुरावे किंवा दावे नाहीत, असं त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

देशभर खेळाडूंचं आंदोलन गाजल्याने या सुनावणीकडे अनेकांच लक्ष लागून राहिलं आहे. न्यायालयात ब्रिजभूषण स्वत: हजर झाले, त्यावेळी त्यांच्या घरी आणि न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता 20 जुलै रोजी कोर्टात नियमित जामिनावर सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय येईपर्यंत ब्रिजभूषण अंतरिम जामिनावर राहणार आहेत.

Exit mobile version