Download App

Budget 2024 : आयकरात सूट मिळणार…सर्वेक्षणात नेमकं काय म्हटलं?

Image Credit: Letsupp

Budget 2024 : यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) संसदेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठीच सर्वेक्षणात उद्योगांशी सबंधित 120 प्रमुखांकडून मते मागवण्यात आली आहेत. या सर्वेक्षणानूसार नागरिकांना करामध्ये सवलती मिळणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, करात सूट दिली जाणार नसल्याचं 63 टक्के नागरिकांचं मत असून सवलत दिली जाणार असल्याचं 37 टक्के नागरिकांचं मत आहे. जागतिक धोक्याचंही मोठं आव्हान असून 55 टक्के लोकांनी हा धोका असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर!

तसेच 25 टक्के लोक नोकऱ्यांमधील वाढीव वाढ हा धोका मानत आहेत. सर्वेक्षणात, 13 टक्के लोक निर्यात मागणीला एक घटना मानत असून 8 टक्के लोकं ग्रामीण भागातील आव्हानांना धोका मानत आहेत. सरकारने रोजगार वाढवण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला पाहिजे, असं 57 टक्के लोकांचे म्हणणं असून 46 टक्के लोकांचे मत आहे की सरकारने क्षमता विस्ताराचे ध्येय ठेवले पाहिजे.

मनोज जरांगेंचे वादळ मुंबईच्या दिशेने अन् CM शिंदे मूळ गावच्या जत्रेसाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर

सरकारकडून व्यवसायाला मदत करण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं मत 43 टक्के लोकांचं असून 28 टक्के व्यापारी निर्यातीसाठी पाठिंबा देण्याची मागणी करत आहेत. केअर रेटिंगच्या सर्वेक्षणात, व्यावसायिकांनी मान्य केले की, सरकारचे क्षमता विस्तारावर लक्ष केंद्रीत राहणार आहे. यामध्ये अर्थसंकल्पाला 86 टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर क्षमता विस्ताराबाबत, 30 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा जास्त असू शकतो.

Maratha Reservation : तब्बल 200 प्रश्न अन् 40 पानांचा अर्ज; ‘सर्वेक्षणा’च्या अर्जात नेमकं काय?

दरम्यान, गेल्या वर्षीच्या 10 लाख कोटींच्या तुलनेत यंदा 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे व्यावसायिकांना वाटते. तर 30 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की ही रक्कम सुमारे 10 ते 11 लाख कोटी रुपये असू शकते. बजेट नकारात्मकही असू शकते, असंही 1 टक्के लोकांना वाटत, असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

follow us

वेब स्टोरीज