Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे असं सांगत, देशाला संबोधित करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी
आजचं हे बजेट अंतरिम बजेट आहे. त्याचबरोबर ते इनक्लोजिंग आणि इनोव्हेटिव्ह बजेट आहे. यामध्ये सातत्याचा आत्मविश्वास आहे. हे बजेट विकसित भारताचे चार स्तंभ तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या सर्वांना सक्षम करणार आहे. निर्मला सितारामन यांनी सादर केलेले हे बजेट देशाचे भविष्य निर्माण करणारे बजेट आहे.
Dhanush: सुपरस्टार धनुषच्या ‘या’ सिनेमाच्या चित्रीकरणाला ब्रेक; पोलिसांनी थांबवलं शूट
या बजेटमध्ये 2047 च्या विकसित भारताच्या पाया मजबूत करण्याची गॅरंटी आहे. मी निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. यामध्ये तरुण भारताच्या तरुणांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रिसर्च आणि इनोवेशनवर एक लाख कोटींचा फंड निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. स्टार्टअप ला देण्यात येणाऱ्या कर सवलतीत देखील वाढ करण्यात येणार आहे.
Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?
वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत भांडवली खर्चाला 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांचे ऐतिहासिक तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमधून तरुणांसाठी अनेक संधी निर्माण होतील. देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल. रेल्वे क्षेत्रासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. लखपती दीदी, आयुष्मान भारत, आशा कर्मचारी, रूफ टॉप सोलर योजनांना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न वाढवून खर्च कमी करणाऱ्या योजना या बजेटमध्ये आणले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक बजेट साठी मी देशातील नागरिकांना शुभेच्छा देत आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.