Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?

Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारचे अंतरिम बजेट सादर केले. सितारामन (Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था सरकारने केल्याचे सितारामन यांनी सांगितले. त्यानंतर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना या बजेटमधून कुणाला नेमकं काय मिळालं याची माहिती घेऊ या..

इनकम टॅक्स स्लॅब जैसे थे

केंद्र सरकारने यंदा इनकम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax) कोणताच बदल केला नाही. मध्यमवर्गीय करदात्यांसाठी हा मोठा झटकाच आहे. कररचनेत काही बदल होऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने याचा विचार केला नाही. आधी जो स्लॅब होता तोच कायम ठेवण्यात आला आहे. इनकम टॅक्सबाबतची जुनी प्रकरणे मागे घेणार असल्याने 1 कोटी करदात्यांचा मात्र फायदा होणार

अंतरिम बजेट : एका क्लिकवर पाहा…Budget Highlights (Key Features)

साध्या रेल्वेला मिळणार ‘वंदे भारत’चा लूक

आगामी काळात देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार केले जातील. तसेच 40 हजार सामान्य डब्यांना वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर विकसित केले जाईल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि सुविधा देण्याचे उद्दीष्ट साध्य होईल.

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी महिलांना ज्ञान दिले जाते.

सन 2024-25 मध्ये एकूण 47.66 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 5.1 टक्के असण्याचा अंदाज आहे. जी पुढील वर्षात 4.5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यांच्या सुधारणा योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे . हे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज असेल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.


अंतरिम बजेट : एका क्लिकवर पाहा…Budget Highlights (Key Features)

बजेटमध्ये कुणाला काय मिळणार ?

महिला :

– महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार
– पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना
– गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढविले जाईल
– सर्व क्षेत्रांमध्ये नॅनो DAP चा वापर वाढविला जाईल
– अंगणवाडीचा दर्जा सुधारणार
– ‘आशा’ कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ
– लखपती दीदींची संख्या 20 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढणार

तरूण :

– स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण
– देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
– देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM सुरू करणार

शेतकरी :

– PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत
– पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
– 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला.
– दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणणार
– शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर,
– सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार
– मत्स्यपालन योजनेला चालना देणार
– सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य
– सरकार 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार

पायाभूत सुविधा

-FY25 मध्ये पायाभूत सुविधांवर 11.1% अधिक खर्च केले जातील
– ऊर्जा, सिमेंट आणि बंदरसाठी नवीन 3 कॉरिडॉर तयार करणार
– 40 हजार साधे डबे वंदे भारत डब्यांमध्ये रूपांतरित करणार
-पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल
– मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार
-पंतप्रधान गति शक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल
– छोट्या शहरांना जोडण्यासाठी 517 नवीन मार्गांवर UDAN योजना आणणार

सर्वसामान्य :

– रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
– पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार
– देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
– 10 वर्षापूर्वीचा 10 हजारपर्यंतचा टॅक्स माफ
– टॅक्सस्लॅबमध्ये बदल नाही, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

follow us
  • fb
  • instagram
  • youtube