Download App

Bus Fire Accident : मध्यप्रदेशात अपघातानंतर बस पेटली; 12 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

Bus Fire Accident : मध्य प्रदेशातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुना जिल्ह्यात (Bus Accident) कालरात्री डंपर ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस पेटली आणि या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुना-आरोन रोडवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरची प्रवासी बसला धडक बसली. धडक इतकी जोरात होती की या धक्क्याने बस पलटी झाली आणि बसने पेट घेतला.

Road Accident : भीषण अपघात! भरधाव वेगातील ट्रक हॉटेलात घुसला; तिघांचा जागीच मृत्यू

या घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 14 प्रवासी जखमी झाल आहेत. बस आरोनच्या दिशेने जात होती. तर डंपर गुनाच्या दिशेने येत होता. यावेळी बसमध्ये 30 प्रवासी होती. काय होत आहे कळण्याच्या आतच बसला धडक बसून बस पलटली आणि पेट घेतला. आग लागल्यानंतर मात्र बाहेर पडण्यासाठी प्रवासी धडपड करू लागले. चार जण बाहेर पडले पण बाकीचे मात्र बसमध्येच अडकले. त्यानंतर आगीने सगळी बसच कव्यात घेतली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनीही या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हटले की या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठिशी आहे. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी प्रशासनाला जखमींवर योग्य उपचार करण्याची तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना चार लाख आणि जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जगीच ठार

 

 

follow us