VIDEO : मुस्लिम IPS Bushra Bano ने ‘अस्सलाम-अलैकुम’ म्हटलं…तडकाफडकी बदली?

बंगालमध्ये IPS अधिकारी बुशरा बानो यांनी भाषणाच्या सुरुवातीला 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्याने तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा सुरु झालीयं.

IPS Bushra Bano

IPS Bushra Bano

IPS Bushra Bano : पश्चिम बंगाल केडरच्या 2021 बॅचच्या IPS अधिकारी बुशरा बानो (IPS Bushra Bano) यांच्या बदलीवरुन सध्या चांगलाच वाद तापलायं. एका कार्यक्रमातील संवादादरम्यान, IPS बुशरा बानो यांच्या बदलीपूर्वी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बानो अस्सलाम-अलैकुम या अभिवादनाने केलीयं. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत असतानाच IPS बुशरा बानो यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं. बानो यांची बदली व्हिडिओमध्ये अस्सलाम-अलैकुम म्हटल्याने झालीयं, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

व्हिडिओमध्ये त्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीतील आपले अनुभव सांगताना दिसतात. त्यांनी व्हिडिओची सुरुवात ‘अस्सलाम-अलैकुम’ या अभिवादनाने केली होती. संवादादरम्यान त्यांनी ‘इन्शाअल्लाह’ आणि शेवटी ‘जझाकल्लाह’ असे शब्दही वापरले. याशिवाय, त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (AMU) निवासी कोचिंग अकादमीचा उल्लेख करत, यूपीएससीच्या तयारीमध्ये या अकादमीने आपल्याला कशी मदत केली, याची माहिती दिली होती.

व्हिडिओवर ‘हिंदू लीगल फंड’ नावाच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे. सरकारी पदावरील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक संवादामध्ये धार्मिक अभिवादन किंवा धार्मिक शब्दांचा वापर करण्याऐवजी राष्ट्रीय अभिवादनाचा वापर करावा, असा या संघटनेचा युक्तिवाद आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या गृहसचिवांकडे तक्रार करण्याचा इशाराही संघटनेने दिलाय. यानंतर सोशल मीडियावर बुशरा बानो यांच्या व्हिडिओची आणि त्यांच्या बदलीची चर्चा अधिक तीव्र झालीये.

दरम्यान, बुशरा बानो यांच्या बदलीच्या अधिकृत आदेशात त्यांच्या व्हिडिओचा किंवा संबंधित तक्रारीचा बदलीचे कारण म्हणून कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. आदेशात ही नियुक्ती प्रशासकीय स्वरूपाची असून ‘जनहितार्थ’ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बुशरा बानो या उत्तर प्रदेशातील कन्नौजच्या रहिवासी आहेत. त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेतले असून पीएचडी पूर्ण केल्यानंतर सौदी अरेबियात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. यूपीएससी त्यांनी परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाचीही चर्चा होत आहे.

Exit mobile version