गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; कमर्शिअल सिलिंडरचे दर 24 रुपयांनी घटले

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price

LPG Price : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्य नागरिकांना गुडन्यूज (LPG Price) मिळाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केल कंपन्यांनी केली नाही. तर दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधी 8 एप्रिल रोजी सिलिंडरच्या दरात बदल झाले होते.

आयओसीएलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार देशातील चार महानगरांत कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. जून महिन्यात व्यावसायिक गॅसचे दर 24 रुपयांनी कमी झाले आहेत. मे महिन्यात गॅसच्या दरात 14.50 रुपयांनी घट झाली होती. आता दर कमी झाल्याने याचा परिणाम थेट हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर होईल. राजधानी दिल्लीत 19 किलोचा कमर्शिअल सिलेंडर आता 1723.50 रुपयांना मिळेल.

बजेटआधी गुडन्यूज! LPG सिलिंडरच्या दरात मोठा बदल; किती रुपयांनी स्वस्त

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची स्थिती आणि अन्य बाजार परिस्थितीच्या आधारावर किंमतीत घट किंवा वाढ केली जाते. मे महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाली होती. सलग तीन महिन्यांत गॅसच्या दरात कपात झाली आहे. याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी गॅस घेणाऱ्या विक्रेत्यांना होणार आहे.

घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही

या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.

आश्चर्यच! चक्क कचऱ्यावर धावतात ‘या’ शहरातील बस; गॅस विक्रीतून मिळतंय लाखोंंचं उत्पन्न

Exit mobile version