Gold Price at All time High : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक (Gold Price) पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. देशांतर्गत सराफ बाजार असो किंवा फ्युचर्स मार्केट सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील स्पॉट मार्केट आणि फ्यूचर मार्केट्समध्ये सोन्याच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाली. सोमवारी पिवळ्या धातुच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली. या दिवसांत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल किंवा सोन्यात गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे.
Gold Prices : अर्थसंकल्पापूर्वी सोने ८२ हजारांच्या पल्याड ; दरात मोठा फेरबदल होणार
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसा एक तोळा सोन्याचे दर 88 हजार 500 रुपये झाले आहेत. सोने दराच्या इतिहासातील ही विक्रमी दरवाढ आहे. सोनेच नाही तर चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. सोन्याच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींचा यावर मोठा परिणाम झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व स्टील आणि अॅल्युमिनियम धातूच्या वस्तूंवर 25 टक्के नवीन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. यानंतर जागतिक पातळीवर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या दरात प्रति औंस 2900 डॉलर्सची उसळी दिसून आली. दागिन्यांचे विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्यानेही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्ध कमी होत आहे. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे जगासाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. व्यावसायिक आणि व्यापारी वातावरण अस्थिर झाले आहे. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर झाला आहे. मुंबईतील जव्हेरी बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक दर सोमवारी 85 हजार 665 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
मागील आठवड्यात सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. या आठवड्यात मात्र सोन्याची घोडदौड सुरू झाली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली होती. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचे दर 79 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव 87 हजार 210 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 85 हजार 665 रुपये, 23 कॅरेट 85 हजार 322 रुपये, 22 कॅरेट 78 हजार 469 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचे भाव 64 हजार 249 रुपये होते.
सोने खरेदी का महत्त्वाची? ‘ही’ पाच कारणं ओळखा अन् सोन्यात गुंतवणूक कराच!
वायदे बाजारात सोन्याने 85 हजारांचा टप्पा पार केला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 86 हजारांपर्यंत पोहोचला आहे. पीसी ज्वेलर्सचे सीएमडी राहुल गुप्ता यांनी सांगितले की सोन्याचा भाव लवकरच एक लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. ट्रम्प व्यापार युद्ध, डॉलरची वाढ अशीच राहिली तर दिवाळी सणापर्यंत सोन्याची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.