PF Interest Rate : केंद्र सरकारने ईपीएएफवर व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के असा व्याजदर राहील अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने या व्याजदरासाठी शिफारस आधीच केली होती. यानंतर सरकारने ही शिफारस मान्य केली आहे. या निर्णयाची देशातील सात कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
मागील वर्षातही पीएफ ठेवींवर 8.25 टक्के हाच व्याजदर होता. या वर्षात ईपीएफओने 13 लाख कोटी रुपयांच्या मूळ जमा रकमेवर 1.07 लाख कोटी रुपये कमावले होते. 2022-23 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर या वर्षातही 8.15 टक्के व्याजदर होता. याय वर्षी 11.02 लाख कोटी रुपये मूळ रकमेवर 91 हजार 151.66 कोटी रुपयांची कमाई झाली होती.
कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! PF अकाउंट ट्रान्सफर करणं आणखी सोपं; EPFO ने केला ‘हा’ बदल
ईपीएफओने या आर्थिक वर्षात 6 मार्च 2025 पर्यंत 2.16 कोटी ऑटो क्लेम सेटलमेंट केले आहेत. हे सुद्धा एक रेकॉर्डच आहे. मागील वर्षात 2023-24 मध्ये हा आकडा 89.52 लाख होता. ऑटो क्लेम सेटलमेंट म्हणजे कोणत्याही कागदोपत्री कार्यवाहीऐवजी लोकांना त्यांचे पैसे मिळाले. ईपीएफचे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून (CBT) निश्चित केले जातात. या मंडळात मालक, कर्मचारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी आणि श्रम मंत्रालयाचे अधिकारी असतात.
यावर अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाकडून घेतला जातो. मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर यास नोटिफाय केले जाते. यानंतर लोकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जातात. साधारणपणे हे काम आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या भागात केले जाते. मागील दहा वर्षांत ईपीएफच्या व्याजदरात बदल दिसून आले आहेत. 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. 2019-20 मध्ये 8.5 टक्के होता. नंतर 2021-22 मध्ये यात घट होऊन 8.1 टक्के करण्यात आला होता. हा व्याजदर चार दशकांच्या काळात सर्वात कमी होता. पण मागील दोन वर्षात यांत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत याची माहिती घ्यायची असेल तर तुमच्या मोबाइलमध्ये उमंग नावाचे अॅप डाउनलोड करा. मोबाइल नंबरने रजिस्टर करा. यानंतर ईपीएफओ सर्व्हिसेस सेक्शनमध्ये जाऊन बॅलन्स आणि पासबूक चेक करू शकता.
यात दुसरा पर्यायही आहे. यासाठी सर्वात आधी ईपीएफओच्या वेबसाइटवर जा. येथे लॉगइन करा. नंतर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाका. Member Passbook सेक्शनमध्ये जाऊन बॅलन्स चेक करू शकता. तुमच्या UAN रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या. यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याचा मेसेज येईल.
पीएफ क्लेम अन् व्हेरिफिकेशन.. EPFO चे 2 मोठे नियम बदलले; कोट्यवधी ग्राहकांवर होणार परिणाम