Download App

‘इंडिया’चा ‘एनडीए’ला दणका! पोटनिवडणुकीत चार जागांवर बाजी; भाजपला 3 जागा

By Poll Election Result : लोकसभा निवडणुकांआधी इंडिया आघाडी (India Alliance) आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) यांच्यासाठी सेमी फायनल मानल्या जात असलेल्या सहा राज्यातील सात पोटनिवडणुकांचे निकाल (By Poll Election Result) जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सात पैकी चार जागा जिंकत इंडिया आघाडीने एनडीएला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त तीनच जागा जिंकता आल्या. एकत्रितपणे निवडणूक लढविल्यास भाजपाचा पराभव करता येतो हे इंडिया आघाडीने या निकालातून दाखवून दिले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या घोषणेनंतर 5 सप्टेंबर रोजी सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी झाली.

यामध्ये इंडिया आघाडीने सातपैकी चार जागांवर विजय मिळवला तर भाजपला तीन जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड, उत्तराखंड, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यात पोटनिवडणुका झाल्या होत्या.

Morocco Earthquake : मोरोक्कोत जीवघेणा भूकंप! 296 हून आधिक ठार, इमारती कोसळल्या

उत्तर प्रदेशात भाजपला चूक महागात पडली

केंद्रातील सत्ताधारी भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या उत्तर प्रदेशातील घोसी पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. ही जागा जिंकता येण्यासारखी होती. मात्र भाजपला येथे काही चुका नडल्या. एकतर भाजपाने सपातून आलेले दारासिंह चौहान यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे, याच चौहान यांनी सत्ता येणार नाही असे वाटत असतानाच सपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. भाजपनेही पुन्हा त्यांनाच तिकीट दिले. त्यामुळे येथील लोक चिडले. योगी-मोदी से बैर नहीं, दलबदलुओंकी खैर नहीं असे म्हणत त्यांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त केला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांनी निवडणुकीचे उत्कृष्ट नियोजन केले. यामुळे सपाचे उमेदवार सुधाकर सिंह यांनी दारासिंह चौहान यांचा 42 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

झारखंड राज्यातील दुमरी मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी यांनी विजय मिळवला. उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पार्वती दास यांनी विजय मिळवला. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुथुपल्ली मतदारसंघात त्यांचा मुलगा विजयी झाला.

मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

बंगालमध्ये तृणमूलचाच विजय

पश्चिम बंगालमधील धुपगिरी मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे तृणमूलचे निर्मल चंद्र रॉय विजयी झाले. त्रिपुरात मात्र भाजपलाच यश मिळाले. येथील दोन्ही पोटनिवडणुकांत भाजपाचे उमेदवार विजयी झाले. बॉक्सानगरमधून तफज्जल हसन आणि धनपूर मतदारसंघातून बिंदू देवनाथ यांनी विजय संपादन केला.

Tags

follow us