Minister Ashwini Vaishnav : देशात कृषीविषयक धोरण राबवताना केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कृषी संबंधित उपक्रमांना चालना देण्यासाठी एकूण 13,966 कोटी रुपयांना मंजुरी दिलीयं. यामध्ये डिजिटल कृषी मोहिम, अन्न व पोषण सुरक्षा, पशुधन, फलोत्पादन, शिक्षण व्यवस्थापनाच्या विकासाला चालना देण्यासाठी निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिलीयं. दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका
मंत्री वैष्णव म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात आधी डिजिटल कृषी मोहिम असून याच धर्तीवर विकसित केले जाणार आहेत. शेतीसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. डिजिटल प्रकल्पांसाठी एकूण 20, 817 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशनची स्थापना करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलंय.
मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय कोणते?
डिजिटल कृषी मोहिमेसाठी 2,817 कोटी रुपयांची मंजुरी
अन्न, पोषण सुरक्षेसाठी 3,979 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
कृषी शिक्षण, व्यवस्थापन योजनेसाठी 2,291 कोटी रुपयांची मंजुरी
फलोत्पादन योजनेसाठी 860 कोटी रुपये मंजूर
पशुधन आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी 71,702 कोटी रुपये मंजूर
कृषी विज्ञान केंद्राच्या विकासासाठी 1,202 कोटी रुपये मंजूर
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजनेसाठी 1,115 कोटी रुपये मंजूर