कंगनाच्या ‘इमर्जन्सी’बाबत वाद वाढला, चित्रपटाच्या रिलीजला ब्रेक, सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी निर्मात्यांची धडपड
Emergency Movie Release Date: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांचा ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie ) हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून कंगनाने या सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका साकारली. सध्या या चित्रपटाला खूप संघर्ष करावा लागत आहे. एवढेच नाही तर सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी निर्मात्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळं या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकण्यात आली.
मोदींचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलटं सुलटं…; शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र
‘इमर्जन्सी’ चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार असून दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, आता हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही; चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य…
इमर्जन्सी सिनेमाविरोधात सध्या पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या चित्रपटावर शीखविरोधी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि जगमोहन सिंग यांनी इमर्जन्सी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे.
चित्रपटाला सेन्सॉरचे प्रमाणपत्रही नाही
दरम्यान, सेन्सॉर प्रमाणपत्र मागे घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीएफसीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्य पॉल जैन यांनी न्यायालयात सांगितले की, चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याबाबत विचार केला जात आहे, परंतु अद्यापपर्यंत चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही. नियमानुसार चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र दिले जाईल आणि चित्रपटावर कोणाचा काही आक्षेप असेल तर ते सेन्सॉर बोर्डाला कळवू शकतात, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
तर अकाली दलाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. एसजीपीसीनेही हा चित्रपट शीखविरोधी असल्याचा आरोप केला आहे. चित्रपटावर बंदी घालावी आणि प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट शीख प्रतिनिधींना दाखवावा, अशा मागण्या करण्यात आली. ‘इमर्जन्सी’च्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र निर्माते लवकरच अधिकृत घोषणा करणार आहेत.