Download App

Cafe Coffee Day : सुप्रसिद्ध ‘कॉफी डे’ कंपनीची अर्थिक स्थिती बिघडली, कर्जाचा डोंगरच उभा…

Cafe Coffee Day : सुप्रसिद्ध कॅफे कॉफी डे म्हणजेच CCD नावाने देशात प्रसिद्ध असलेल्या कंपनीची अर्थिक स्थिती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या अर्थिक वर्षात कंपनीची एकूण थकबाकी 450 कोटींच्या जवळपास असल्याची महिती स्वत: कंपनीनेच दिली आहे. यासंदर्भात स्टॉक एक्स्चेंचला कंपनीने माहिती दिली आहे.(cafe coffee day ccd default in april june quarter totals around 450 crore)

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल; कोल्हापूर पुन्हा महापुराच्या उंबरठ्यावर; कलेक्टर ऑफिसमध्ये सामानाची बांधाबांध

या कंपनीचे संस्थापक व्हीजी सिद्धार्थ यांच्या निधनानंतर कंपनी मोठ्या अर्थिक संकटात सापडली आहे. कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडकडे अधिक रक्कम द्यावयाची असून कंपनीने NCDs आणि NCRPS सारख्या अनलिस्टेड डेट सिक्युरिटीजद्वारेही कर्ज घेतलं आहे. या प्रकारचं कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड 244.77 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलं आहे.

BMC जिंकण्यासाठी भाजपची आयडिया; सर्व माजी नगरसेवकांना दोन शिफ्टमध्ये लावलं कामाला

यासोबतच बँका आणि इतर सावकारांकडून रोख क्रेडिटच्या माध्यमातून 220.48 कोटी रुपये थकित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यापैकी 189.70 कोटी रुपये कर्ज कंपनीने फेडलं आहे. तर 5.78 कोटी रुपयांचे व्याज भरण्यात कंपनी अपयशी ठरली आहे.

दरम्यान, पुढील काळात कंपनी आपली मालमत्ता विकून पैसे चुकवणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीने 2020 मध्ये 13 कर्जदारांना 1,644 कोटी रुपये चुकवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर कंपनीने मालमत्ता विकली होती.

Tags

follow us