Download App

अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले

  • Written By: Last Updated:

Justin Trudeau Flight : दोन दिवस अडकून पडल्यानंतर अखेर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानाने आज दिल्लीहून उड्डाण घेतले. विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज सकाळी दिली.

विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. ट्रूडो आणि त्यांचे शिष्टमंडळ रविवारी (10 सप्टेंबर) संपलेल्या G20 शिखर परिषदेनंतर दिल्लीहून रवाना होणार होते, परंतु फ्लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे ते येथेच अडकले होते.

ट्रूडो शुक्रवारी (8 सप्टेंबर) भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांवरही चर्चा केली.

Samudrayaan Mission : चांद्रयान-3 नंतर समुद्रयान मोहीम! समुद्राचा तळ गाठणार ‘मत्स्य 6000’

तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी ट्रूडो यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. जस्टिन ट्रूडो या भेटीत कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांच्या मुद्दा या बैठकीतील प्रमुख विषयांपैकी एक होता. पंतप्रधान मोदींनी कॅनडातील अतिरेकी घटकांच्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्ती केली.

पुणेरी पगडी ! शोभतेय का ?; लोकसभेसाठी इच्छुक सुनील देवधरांनी विचारला प्रश्न

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया एक्स वर लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे आभार मानण्यासाठी मी विमानतळावर पोहोचलो. ट्रूडो यांना G-20 मध्ये त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि परतीच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.” यावेळी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही ट्रूडोसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Tags

follow us