Download App

मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या ! दारू घोटाळ्यानंतर हेरगिरीचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) आणखी एका प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली फीडबॅक युनिट (Delhi Feedback Unit) भ्रष्टाचार प्रकरणात ही एफआयआर (FIR) करण्यात आली आहे. या फीडबॅक युनिटची स्थापना आम आदमी पार्टीने 2015 मध्ये केली होती. या युनिटच्या नावाखाली आप इतर पक्षांच्या नेत्यांची हेरगिरी करत असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढत आहेत. दारू घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सिसोदिया हे आधीच दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर त्यांना ईडीने या घोटाळ्यात मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. सीबीआयने गुरुवारी दिल्ली फीडबॅक युनिट प्रकरणात सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे हेरगिरी सिसोदिया यांनी करून घेतल्याचा आरोप आहे.

इम्रान खानला न्यायालयाचा मोठा धक्का! पक्षाची रॅली काढण्यास घातली बंदी

काय आहे नेमकं प्रकरण ?

सीबीआयने दिल्ली सरकारच्या ‘फीडबॅक युनिट’मध्ये अनियमितता केल्याप्रकरणी मनीष सिसोदियासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर अप्रामाणिकपणे मालमत्तेचा गैरवापर करणे, गुन्हेगारी कट रचणे, सार्वजनिक सेवकाने विश्वासघात करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटारडे करणे, बनावट कागदपत्रे वापरणे, बँक खाती खोटे करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आकरण्यात आले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज