Download App

CBSE 10th Exam : सीबीएससी बोर्डाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर; 15 फेब्रुवारीपासून सुरुवात

Image Credit: Letsupp

CBSE 10th Exam : सीबीएसई (CBSE) बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानूसार दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु होणार आहे. सीबीएसई बोर्डाकडून परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईवरही विद्यार्थ्यांना डेटाशीट पाहता येणार आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डानं cbseacademic.nic.in वर इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्न बँक आणि मार्किंग पॅटर्न जारी केलाय. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन ते चेक करता येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (CBSE 12th Board Exam 2023) परीक्षा वेबसाईटवर दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत.

10वीचा पॅटर्न:
10वी बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक विषयाचा पेपर एकूण 80 गुणांचा असेल. उर्वरित 20 गुण पीरियॉडिक टेस्ट्स, असाइनमेंट आणि स्किल बेस्ड अॅक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट वर्कद्वारे ग्रेडिंग केली जाईल. 10वी बोर्ड परीक्षेत 40% प्रश्न MCQ प्रकारचे असतील, 20% सिच्युएशनवर आधारित प्रश्न असतील आणि 40% प्रश्न लहान किंवा दीर्घ उत्तरे प्रकारची असतील. सर्व प्रश्न तीन तासांत सोडवावे लागतील.

12वी बोर्ड परीक्षा पॅटर्न:
12वी बोर्डाच्या परीक्षेत अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज आणि इकॉनॉमिक्सच्या परीक्षा 80 गुणांच्या असतील, तर 20 गुण अंतर्गत परीक्षेच्या आधारे दिले जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर 70 गुणांचा आणि प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची असेल. इतर सर्व विषयांचा पेपर फक्त 80 गुणांचा असेल आणि 20 गुण प्रोजेक्ट/असाइनमेंटच्या आधारावर दिले जातील. सर्व प्रश्न तीन तासांत सोडवावे लागतात.

Tags

follow us

वेब स्टोरीज