CBSE चं मोठं पाऊल! नववी-दहावीमध्ये तीन भाषा अनिवार्य; दोन भारतीय भाषा असणं बंधनकारक

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर ही नवी रचना तयार करण्यात आली आहे.

Untitled Design 38 1

Untitled Design 38 1

CBSE’s big decision for language preservation : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता नववी आणि दहावीच्या भाषा धोरणात मोठे बदल जाहीर केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर ही नवी रचना तयार करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता तीन भाषांचा अभ्यास अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या मूळ भारतीय भाषा असणे बंधनकारक राहणार आहे.

15 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, 1 जुलै 2026 पासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना R1, R2 आणि R3 अशा तीन भाषा शिकाव्या लागतील. यामध्ये भाषांना प्राधान्य देण्यात आले असून, भाषिक विविधता आणि मातृभाषेचा प्रसार हा या धोरणामागील मुख्य उद्देश असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध राहणार असला, तरी त्यासाठी इतर दोन भाषा भारतीय असणे आवशयक राहील. तसेच परदेशी भाषेचा अभ्यास चौथी अतिरिक्त भाषा म्हणून देखील करता येणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांबरोबरच जागतिक भाषांचे ज्ञान मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

जरांगे पाटलांची आंदोलनाची घोषणा होताच सदावर्ते मैदानात, एकनाथ शिंदेंचं नाव घेत केला ‘हा’ आरोप

सीबीएसईने सर्व संलग्न शाळांना अद्ययाबाबत अभ्यासक्रमातील उद्दीष्टे, कौशल्ये आणि लर्निंग आउटक्रम्सचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील वाचन आकलन, मौखिक संवाद, व्याकरण आणि लेखन कौशल्यांमध्ये सुमारे 75 ते 80 टक्के समानता असल्याचे देखील बोर्डाने नमूद केले आहे.

दरम्यान, R3 साठी स्वतंत्र पाठयपुस्तके उपलब्ध होईपर्यंत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना सहावीच्या R3 पाठयपुस्तकांचा वापर करावा लागणार आहे. यासोबतच स्थानिक आणि राज्यस्तरीय साहित्य, कविता, लघुकथा आणि कादंबऱ्यांचा अध्यापनात समावेश करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. या संक्रमण काळात काही शाळांना भारतीय भाषांसाठी पात्र शिक्षक मिळण्यात अडचणी येऊ शकतात, हे देखील सीबीएसईने मान्य केले आहे.

त्यासाठी सहोदय क्लस्टर्सद्वारे संसाधनांची देवाणघेवाण, हायब्रीड अध्यापन पद्धती, सेवानिवृत्त शिक्षकांची मदत आणि पात्र पदव्युत्तर उमेदवारांची नियुक्ती यांसारखे पर्याय शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, 19 अनुसूचित भारतीय भाषांमधील इयत्ता सहावीची R3 पाठ्यपुस्तके 1 जुलै 2026 पूर्वी शाळांना उपलब्ध करून दिली जातील, अशी माहितीही सीबीएसईने दिली आहे. पूरक साहित्य आणि त्याच्या अध्यापनासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे 15 जून 2026 पर्यंत जारी करण्यात येणार आहेत.

Exit mobile version