Download App

CBSE 12Th Result 2023 : सीबीएसई 12वी बोर्डाचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी

  • Written By: Last Updated:

CBSE 12TH Result 2023 : सीबीएसईने 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. यंदा निकालासोबत विद्यार्थ्यांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी दिली जाणार नसल्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना अनावश्यक स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी 12वी मध्ये एकूण 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागाने 99.91 उत्तीर्णतेसह अव्वल स्थान पटकावले आहे. यंदाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून, मुलांचा निकाल 84.67 टक्के, तर मुलींचा निकाल 90.68 टक्के लागला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल उमंग, डिजीलॉकर या मोबाईल अॅपवर आणि बोर्डाच्या वेबसाइटवर पाहू शकणार आहेत. याशिवाय cbse.gov.in , cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून जाऊनदेखील विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.

यावेळी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 टक्के इतका लागला असून, त्रिवेंद्रम विभागाने 99.91 उत्तीर्णतेसह अव्वल स्थान पटकावले आहे. यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. 12वीचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वररोजी जारी केला जाईल.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तो पाहू शकणार आहेत. त्यानंतर डिजीलॉकरवरून विद्यार्थी निकाल डाउनलोड करू शकतील. यावेळी सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षेत सुमारे 38 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेदरम्यान मंडळाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

कसा तपासाल निकाल?

विद्यार्थी त्यांच्या निकाल एसएमएसद्वारेही तापसू शकतील यासाठी विद्यार्थांना फोनच्या मेसेज बॉक्सवर जावे लागेल. येथे CBSE 12 वी टाइप करा आणि स्पेस न देता रोल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर हा मेसेज 77388299899 वर पाठवावा. यानंतर विद्यार्थांना त्यांचा निकाल पाहता येईल.

Udhav Thackeray : ठाकरे अध्यक्षांना पत्र लिहिणार, चुकीचा निर्णय दिला तर कोर्टात जाणार

याशिवाय विद्यार्थी त्यांचा निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in , cbseresults.nic.in वर जाऊनदेखील बघू शकतील. यासाठी विद्यार्थांना वेबसाइटच्या होमपेजवरील CBSE 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे लॉगिन विंडोमध्ये CBSE 12वीचा रोल नंबर टाकाल्यानंतर स्क्रिनवर स्कोअरकार्ड दिसेल विद्यार्थी हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकतील.

Tags

follow us