Video : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ राज्यांमध्ये उद्यापासून ‘एसआयआर’ला सुरुवात होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली. SIR च्या दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणं, नवीन मतदार जोडणं आणि चुका दुरुस्त करणं आहे.

News Photo (83)

News Photo (83)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत देशव्यापी (SIR) एसआयआर (मतदार याद्यांचीफेरतपासणी) ची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, एसआयआरचा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होत आहे. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणं, नवीन मतदार जोडणं आणि चुका दुरुस्त करणं समाविष्ट असेल.

ज्ञानेश कुमार यांनी काय म्हटलं?

बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वी पार पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राज्यातील निवडणूक आयोगाच्या आयुक्तांबरोबर एक महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत एसआयआरबाबत सविस्तर चर्चा झाली. एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर आता काही राज्यात यशस्वी एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. एसआयआरचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रत्येक योग्य मतदाराचा मतदार यादीत समावेश करणं आणि अयोग्य मतदाराचं नाव मतदार यादीतून कमी करणं, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता देशातील १२ राज्य आणि काही केंद्र शासित प्रदेशात एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. आता या १२ राज्यात आणि काही केंद्र शासित प्रदेशात एसआयआर करण्यात येणार असल्यामुळे आज रात्री १२ नंतर येथील मतदार याद्या गोठवण्यात येतील, निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं आहे.

या राज्यात होणार एसआयआर

छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडूचेरी, राज्यस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान, निकोबार यांचा समावेश आहे.

Exit mobile version