Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April Public Holiday : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी (14 April Public Holiday) जाहीर करण्यात आलीय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीदिनी, 14 एप्रिल रोजी, समाज आणि संविधानातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही घोषणा करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, समाजात समानतेचे नवे युग स्थापित करणारे संविधानाचे शिल्पकार, आपले बाबासाहेब, डॉ. भीमराव आंबेडकर जी यांच्या जयंतीनिमित्त आता सार्वजनिक सुट्टी असेल.
अजय गोगावले आणि आनंदी जोशीच्या सुमधुर स्वरात ‘आता थांबायचं नाय’ चं शीर्षगीत प्रेक्षकांच्या भेटीला
शेखावत पुढे म्हणाले, बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन देशाच्या भावनांचा आदर केला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने जारी केलेल्या सरकारी आदेशात असेही पुष्टी करण्यात आली आहे की, 14 एप्रिल 2025 रोजी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भारतातील औद्योगिक प्रतिष्ठानांसह केंद्र सरकारची कार्यालये बंद राहतील. आदेशात म्हटलंय की, भारत सरकारच्या सर्व मंत्रालये/विभागांनी वरील निर्णय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.
ओडिशाचे माजी राज्यपाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केलंय. त्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
‘मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’, रणजित कासलेंनी थोपटले दंड
झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजप अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ घेतलेला हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार. केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या सन्मानार्थ घेतलेल्या या निर्णयावरून हे स्पष्ट होतंय की, केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क आणि न्याय देण्याच्या त्यांच्या कल्पनांना दृढपणे पुढे नेत आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि रांचीचे खासदार संजय सेठ यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलंय. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करण्याबाबत भारत सरकारची अधिसूचना त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी लिहिले की, अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.