‘मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’, रणजित कासलेंनी थोपटले दंड

‘मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’, रणजित कासलेंनी थोपटले दंड

Suspended PSI Ranjit Kasle New Video : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) एक व्हिडिओ शेअर करत बीड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय बनले होते. 27 मार्च रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ते भेट घेणार होते. परंतु ही भेट झाली नसल्याचं कासलेंनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय. शिंदे (Eknath Shinde) अन् मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’ असं म्हणत रणजित कासले यांनी दंड थोपटले आहेत. तर करूणा मुंडे आणि पंकजा मुंडे या बीडचं भविष्य असल्याचा उल्लेख देखील कासलेंनी केलाय.

माझा व्हिडिओ सुद्धा शुट होत नव्हता. आता सुरू झाला आहे. माझ्या भावावर दबाव टाकला जातोय. मी आतापर्यंत केलेले सर्व आरोप खरे आहेत. लातूरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि किरण चव्हाण यांनी मला खऱ्या अर्थाने मदत केली (Beed Crime) आहे. मला सस्पेन्ड नाही तर डिसमिस करायची धमकी येत आहे. त्यामुळं सोशल मीडियावर मी आजच राजीनामा देतो, असं देखील रणजित कासले यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय.

चाकूने सपासप भोसकले…सातारच्या गौरीला बंगळुरूत संपवलं, पतीकडून क्रूर हत्या

मला फक्त मनसेचे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोनच लोकांवर विश्वास आहे. मी माझे सर्व पुरावे सादर करणार आहे. एका वृत्तवाहिनीला पुरावे सादर केले होते. पण ते देखील वरच्या लेव्हल वरून मॅनेज असल्याचा आरोप कासले यांनी केलाय. त्यांनी माझ्याकडून पुरावे घेतले, परंतु त्यांनी व्हिडिओच लावले नाहीत. त्यामुळे तुम्ही समजू शकता. माझा मोबाईल स्विच ऑफ असून माझं लोकेशन समजतंय.

पोलिसांच्या तीन चार टीम माझ्या मागावर आहेत. माझं इन्स्टाग्रामआयडी हॅक केलेलं आहे. व्हॉट्सअपचं देखील स्टेटस लोकांना दिसत नाहीये. कुठल्या लेव्हलवर हे लोक काय-काय मॅनेज करू शकतात. मी मॅनेज होणार नाही असं देखील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, असं देखील आवाहन त्यांनी केलंय.

खंडणीचा उल्लेखच नाही….जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात वेगळंच

मला केवळ मनसेची साथ मिळाली आहे. अब झुकेगा नही साला, रोख सके तो रोख ले शेखावत असं देखील त्यांनी म्हटलंय. मी केवळ मराठा समाजासोबत काम करत नाही. माझे नेते केवळ एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे नाहीत. तर दहा-पंधरा वर्षांपूर्वी माझे नेते गोपीनाथ मुंडे होते. मी आजही पंकूताई सोबत आहे. त्यांचे फोटो माझ्या व्हॉट्सअपच्या डिपीला देखील असतात. गोपीनाथ मुंडे यांच्यावर माझा विश्वास होता, असं देखील कासले यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube