Haryana Assembly Election 2024 : सध्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात आहे. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. इतर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी या दोन राष्ट्रीय पक्षांची येथे मोठी लढत पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मोठ्या प्रचार सभा या ठिकाणी गाजवल्या आहेत. तर आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येथे सभा गाजवत आहेत. त्यांनी आज हरियाणातील अंबाला येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अंबानी-अदानी यांच्यावरही जोरदार प्रहार केले.
अंबानी अदानी सरकार
राहुल गांधी यांनी आजपासून हरियाणा विजय संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. याबाबत अंबाला येथील नारायणगड येथे जाहीर सभाही झाली. यामध्ये राहुल गांधींनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रत्येकाचा आदर करणे महत्त्वाचं आहेच. परंतु, तुमचा जर 24 तास आदर होत असून तितक्याच तास तुमचा पैसा कुणी हिसकावून घेत असेल तर कसं जमेल ? असा प्रश्न उपस्थित करत हे भाजप सरकार मोदी सरकार नसून हे अंबानी अदानी सरकार आहे असा थेट घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. लोकांच्या खिशात किती पैसा जात आहे आणि त्यांच्या खिशातून किती पैसे काढले जात आहेत हेही तितकेच महत्त्वाचं आहे असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, बिहारला पुराचा धोका
माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या गरीब लोकांच्या खिशात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासाठी त्यांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत. आमच्या खिशातून जास्त पैसे निघत आहेत की जास्त पैसे आमच्या खिशात परत येत आहेत हे पाहण महत्वाचं आहे. अदानी रोज उठून काही शेतात राबत नाही. परंतु, त्यांच्या खात्यात रोज मोठ्या प्रमाणता पैसा जमा होतोय हे कसं होत? हा पैसा कुणाचा आहे असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. तुमच्या बँक खात्यातून पैसे निघतात आणि त्यांच्या बँक खात्यात त्सुनामीसारखे पैसे जमा होतात असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
तितकाच पैसा शेतकऱ्यांना देणार
हरियाणातील तरुण अमेरिकेत का जात आहेत. येथील तरुण प्रत्येकी ५० लाख रुपये देऊन आपला जीव धोक्यात घालून परदेशात जात आहे. इतकंच नाही तर शेतीविषयक कायद्यांवर राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार नवनवीन कायदे शेतकऱ्यांसाठी बनवल्याचं सांगते. असे असेल तर सर्व शेतकरी त्याविरोधात रस्त्यावर का उतरले? कारण आता आमच्या खिशातून पैसे दुसऱ्या मार्गाने हिसकावला जात आहे. त्यामुळे तुम्ही आज जितका पैसा अदानी-अंबानी यांना देत आहात तितकाच पैसा मी शेतकरी, आदिवासी, दलित, युवा यांना देणार असंही ते यावेळी म्हणाले.