Mansukh Mandvia : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र आणि राज्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की. घाबरण्याचं कारण नाही .कारण ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट देशात सध्या पसरत असून त्यासाठी रूग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता अत्यंत कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 6,050 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28 हजार 303 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
World Health Day : टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी ‘या’ सेलिब्रेटीचे जाणून घ्या सिक्रेट्स
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात रूग्णसंख्या झपाट्यान वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत 803 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. पण त्याचबरोबर 687 रूग्ण ठीक देखील झाले आहेत. तसेच 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.