Nitin Gadakari : नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडारवर? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Nitin Gadakari lifethreat :   देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. त्यामधून आता मोठा खुलासा झाला आहे. नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडावर आहेत का असे बोलले जात आहे. कारण नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या प्रकरणामध्ये जयेश पुजारीला पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये त्याने मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T150134.033

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 07T150134.033

Nitin Gadakari lifethreat :   देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. त्यामधून आता मोठा खुलासा झाला आहे. नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडावर आहेत का असे बोलले जात आहे. कारण नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या प्रकरणामध्ये जयेश पुजारीला पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये त्याने मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाऊ शकतो.

नागपूर पोलिसांनी अतिशय गांभीर्याने हे प्रकरण घेतले आहे. आत्तापर्यंते एक नाही तर दोन वेळा नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीला अटक केली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याची कसून चौकशी केली आहे. त्यामधूनचे हे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एबीपी माझा वृत्त वाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.

Corona झपाट्याने वाढतोय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला राज्यांना सल्ला!

गेल्या 12 वर्षांपासून जयेश पुजारी हा वेगवेगळ्या तुरुंगामध्ये आहे. त्यामुळे त्याला जेलमध्ये कोणी मदत करत होते का याचा तपास पोलिस करत आहेत. जेलमधून तो आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल देखील करत असल्याची पोलिसांची माहिती आहे.

Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!

जयेश याने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केली असल्याची माहिती आहे. तो काही वर्षांपूर्वी केरळ येथे असताना आपल्या एका मैत्रीणीच्या प्रभावाखाली येऊन त्याने धर्मपरिवर्तन केले असल्याची माहिती आहे. त्याचे नाव शाकीर असल्याचे कळते आहे. काही कट्टर धार्मिक संघटनांसोबत त्याचा संपर्क असल्याची शक्यता असून त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version