Centre announced President’s Medal awards officers selected from Maharashtra : आज 14 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या विभागात महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पोलीस, कारागृह अग्निशमन आणि होमगार्ड सेवांचा समावेश आहे. राष्ट्रपती पदक, शौर्य व गुणवत्तापूरण सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. त्यांची सविस्तर यादी जाणून घ्या…
मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला
राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक या सन्मानासाठी महाराष्ट्रातील अपर पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, उपपोलीस अधीक्षक सुभाष नानासाहेब भुजबळ आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राजाराम वायचळे यांची निवड झाली आहे. तसेच कारागृह सेवा विभागातून सुभेदार संजीव सखाराम घाणेकर आणि हवालदार संजय राजारामजी तळवारे यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे.
पोलीस दलातील 37 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान
पोलीस सेवा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 37 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपपोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव, उपपोलीस महानिरीक्षक विजयकुमार गोपीनाथ मगर, पोलीस अधीक्षक दिगंबर पांडुरंग प्रधान, उपपोलीस अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, भागीरथ देशमुख, प्रवीण तेजले आणि मनोजकुमार यादव यांचा समावेश आहे.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’; पाकिस्तानचा पंतप्रधान भारताविरुद्ध पुन्हा बरळला!
याशिवाय पोलीस निरीक्षक वैभवकुमार जाधव, संतोष बारगे, विश्वजीत कागिंडे, जितेंद्र कदम, विनोद पाटील आणि प्रदीप चौगावकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदावरील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे.
