Download App

भारीच! कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 34 कोटींचे शेअर्स तेही मोफत; चेअरमनचा असाही उदारपणा..

प्रूडेंट कॉर्पोरेट एडवायजरी सर्व्हिसेसचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय शाह यांची ही खास स्टोरी आहे. संजय शाह यांनी आपल्या जवळपास 650 कर्मचाऱ्यांना 1.75 लाख शेअर्स गिफ्ट रुपात देणार आहेत.

कंपनीचा मालक असो की चेअरमन त्यांचं कर्मचाऱ्यांशी नातं काय असा प्रश्न विचारला तर काम आणि दाम असंच उत्तर डोळ्यांसमोर येतं. पण याही पलीकडं जाऊन कर्मचाऱ्यांना कधी कार, कधी सोन्याची चेन तर कधी थेट फ्लॅट असे एक से बढकर एक गिफ्ट दिल्याचे तुम्ही ऐकले असेलच. आताही असाच एक खास किस्सा घडला. कंपनीच्या चेअरमनने कर्मचाऱ्यांच्या होळीचा आनंद द्विगुणित केला आहे. कर्मचाऱ्यांना कोट्यावधींचे शेअर्स गिफ्ट म्हणून दिले आहेत. मग, आता हा दानशूर चेअरमन आहे तरी कोण? त्याने नेमके किती रकमेचे शेअर्स कर्मचाऱ्यांना गिफ्ट केले आहेत?  यामागे कारण तरी काय? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..  

खरंतर प्रूडेंट कॉर्पोरेट एडवायजरी सर्व्हिसेसचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय शाह यांची ही खास स्टोरी आहे. संजय शाह आपल्या 650 कर्मचाऱ्यांना 1.75 लाख शेअर्स गिफ्ट रुपात देणार आहेत. विशेष म्हणजे ‘सेबी’ने (सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) देखील या व्यवहाराला मंजुरी दिली आहे.

CNBC TV 18 मधील वृत्तानुसार संजय शाह त्यांच्या संपत्तीमधील 34 कोटींपेक्षा जास्त रकमेचे शेअर्स कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून देणार आहेत. कंपनीच्या 25 व्या अॅनिव्हर्सरीनिमित्त त्यांनी हा अनोखा निर्णय घेतला आहे. कंपनीत कमीत कमी तीन वर्षांपासून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे शेअर्स मिळणार आहेत.

PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ

सेबीने या व्यवहारला मंजुरी दिली असली तरी ही एक असामान्य गोष्टच म्हणावी लागेल. कारण प्रमोटरने कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन प्लॅनच्या बाहेर जात शेअर गिफ्ट केले आहेत. या देवाणघेवाणीत Katalyst Advisors यांनी मार्गदर्शन केले आणि रेग्युलेटरी मंजुरी मिळवली. आता हे शेअर्स कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करण्याआधी कंपनी स्टॉक एक्सचेंजच्या लाभार्थ्यांची यादी आणि अन्य माहिती देणार आहे.

आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की संजय शाह कर्मचाऱ्यांना शेअर्स गिफ्ट देणार आहेत. शेअर्स किती रकमेचे आहेत. पण कोट्यावधींचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याचं कारण तरी काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. आता याच उत्तराकडे वळू या..

संजय शाह यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार मानण्याची ही पद्धत आहे. याकडे फक्त शेअर ट्रान्सफर या एकाच दृष्टीतून पाहू नका. खरंतर जे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या प्रती प्रामाणिकपणाने व्यक्त केलेले हे आभार आहेत. कर्मचाऱ्यांचे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि योगदान या त्रिसूत्रीमुळेच आम्ही आज या टप्प्यावर आहोत असे संजय शाह म्हणाले.

PM मोदींना CM शिंदेंचे अनोखे गिफ्ट; वयाच्या 73 आकड्याचा वापर करुन नमो 11 योजनेची घोषणा

एकूणच आताच्या काळात दुर्मिळ वाटणाऱ्या या घटना कुठेतरी घडत आहेतच. यातून प्रामाणिकपणा, सचोटी, परिश्रम यांना मान दिला जात असल्याचे अधोरेखित होत आहे. कर्मचारी काम करतातच पण त्यांच्या कामाला आणि प्रामाणिकपणाला त्यांच्याच कंपनीचा चेअरमन थेट कोट्यावधींचे शेअर्स गिफ्ट देऊन पावती देतोय हे विशेष म्हणावे लागेल.

follow us