PM मोदींना CM शिंदेंचे अनोखे गिफ्ट; वयाच्या ’73’ आकड्याचा वापर करुन ‘नमो 11’ योजनेची घोषणा

PM मोदींना CM शिंदेंचे अनोखे गिफ्ट; वयाच्या ’73’ आकड्याचा वापर करुन ‘नमो 11’ योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल (17 सप्टेंबर) वाढदिवस साजरा झाला. त्यांनी 72 व्या वर्षातून 73 व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने जगभरातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मिडीया, पत्र, सामाजिक सेवा अशा विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदी यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

नरेंद्र मोदी यांच्या वयाच्या 73 या आकड्याचा प्रतिकात्मक वापर करत शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी ‘नमो 11’ या योजनेची घोषाणा केली. या माध्यमातून राज्यातील जनतेला विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. (Maharashtra Chief Minister Eknath Shinde announced ‘NAMO 11’ scheme for the people on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday.)

G20 यशस्वी आयोजन एका व्यक्तीने किंवा पक्षाने केले नाही : PM मोदींनी दिले देशवासियांना श्रेय

जनतेला मिळणार सरकारी योजनेचा लाभ :

‘नमो महिला सक्षमीकरण अभियान’च्या माध्यमातून 73 लाख महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार.

‘नमो कामगार कल्याण’ मोहिमेद्वारे 73,000 बांधकाम कामगारांना सेफ्टी किट.

‘नमो शेतली’ मोहिमेद्वारे 73,000 शेतांचा विकास.

‘नमो स्वयंपूर्ण आणि सौरऊर्जा ग्राम’ अभियानातून 73 गावे स्वयंपूर्ण होणार.

‘नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान’ अभियानाद्वारे सर्वसमावेशक विकास.

‘नमो ग्राम सचिवालय’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची स्थापना.

‘नमो आदिवासी स्मार्ट स्कूल’ मोहिमेद्वारे स्मार्ट शाळांचे बांधकाम.

‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानाच्या माध्यमातून अपंगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारणे.

‘नमो क्रीडा मैदान आणि उद्यान’ या मोहिमेद्वारे सुसज्ज क्रीडांगणे आणि उद्यानांची निर्मिती.

‘नमो सिटी सुशोभीकरण’ अभियानांतर्गत 73 शहरांमध्ये शहर सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येणार.

‘नमो तीर्थक्षेत्र संरक्षण’ मोहिमेद्वारे 73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांचे अद्ययावतीकरण.

विशेष अधिवेशनाचा राज्यघटनेत उल्लेखच नाही; मग आतापर्यंत 8 वेळा कसे झाले विशेष अधिवेशन

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीचा आढावा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण केले. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेल्या मोदींनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वडनगरमधूनच केली. ‘चायवाला ते देशाचे पंतप्रधान’ हा त्यांचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच थक्क करणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचं चहाचं दुकान होतं आणि इथेच त्यांनी चहा विकून वडिलांना हातभारही लावला, त्यासोबतच जिद्दीने अभ्यासही केला.

अगदी कमी वयातच मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजेच आरएसएसशी जोडले गेले. आरएसएसचे सदस्य, प्रचारक सुद्धा काम केलं. या काळातच त्यांच्यातील भाषा कौशल्य, राजकारण्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण याची जडणघडण झाली. लक्ष्मणराव इनामदार आणि डॉ. हेडगेवार यांच्या प्रभावामुळे, हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण करण्याची आणि संघाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा मोदींनी घेतली.

त्यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. 2001 ते 2014 पर्यंत सलग चार विधानसभा जिंकत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी देशात अभूतपूर्व अशी मोदी लाट आली आणि देशात सत्तांतर झालं. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली घेतली. पुढे 2019 च्या ही लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिष्मा कायम राहिला. तेव्हा 30 मे 2019 ला मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube