माझ्याविरोधात कोणताही आधार नसलेले वैयक्तिक आरोप; राम मंदिर चोरीप्रकरणी चंपत राय यांचे रामभक्तांना जाहीर पत्र

Champat Rai:

Champat Rai

Champat Rai

Champat Rai On Ram Mandir Trust Donation Theft: अयोध्यातील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी (Ram Mandir) एसआयटीकडून (SIT) चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आठ आरोपींनी अटक केली आहे. तर राम मंदिर ट्रस्टकडून दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामा मंजूर करण्यात आले आहे. या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा कालच मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी आता माजी सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) यांनी पत्र काढून आपली बाजू मांडली आहे. विशेष तपास पथक (SIT) आपला अंतिम अहवाल सादर करेपर्यंत ते कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे.

राम मंदिरातील देणग्यांची कथित चोरी आणि अपहार प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू आहे. आर्थिक नोंदींची छाननी तसेच आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. भगवान श्रीराम यांच्या भक्तांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात चंपत राय यांनी म्हटले आहे की, श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील दानपेटीतून देणगी मोजणीदरम्यान कथित चोरी झाल्याबाबत अनेक तर्क-वितर्क पसरवले जात आहेत. माझ्याविरोधात अनेकांनी कोणताही आधार नसलेले वैयक्तिक आरोप केले आहेत. मात्र मी आतापर्यंत मौन बाळगले आहे. एसआयटीचा अंतिम अहवाल आल्यानंतर उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर मी सविस्तर बोलणार आहे. त्यानंतर संपूर्ण सत्य सर्वांसमोर येईल.

देणगी चोरीच्या वादानंतर ट्रस्टने चंपत राय यांचा सरचिटणीसपदाचा आणि ट्रस्ट सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला आहे. ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर चंपत राय यांचे पत्र आले आहे.

Exit mobile version