Download App

चंद्राबाबू नायडू 52 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

N Chandrababu Naidu : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज (31 ऑक्टोबर) उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच ते म्हणाले, हा स्नेह मी कधीच विसरणार नाही.

त्यांना पाहण्यासाठी नायडू यांचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. नातू नारा देवांसही आजोबांना भेटायला आला होता. राजमुंद्री तुरुंगातून बाहेर येताच नायडूंनी आपल्या नातवाची गळाभेट घेतली.

चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना प्रकृतीच्या कारणावरून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी (३१ ऑक्टोबर) आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नायडू यांना २८ नोव्हेंबरपर्यंत चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना प्रकृतीच्या कारणावरून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी (30 ऑक्टोबर) न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी (31 ऑक्टोबर) आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नायडू यांना 28 नोव्हेंबरपर्यंत चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

Maratha Protest : जाळपोळ करणाऱ्यांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार, फडणवीसांचा इशारा

हायकोर्टाने नायडू यांना 28 नोव्हेंबरला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हायकोर्टाने नायडू यांना रुग्णालयात उपचाराशिवाय इतर कोणत्याही कामात सहभागी न होण्याचे निर्देश दिले आहेत. फोनवर बोलू नये तसेच कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी होऊ नये किंवा प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ते 53 दिवस तुरुंगात होते. त्याच्या मुख्य जामीन याचिकेवर १० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Tags

follow us