Download App

चंद्रयान-2 ने घेतला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो, ‘चंद्रावरच्या अंधारात कैद झाले सुंदर दृश्य’

  • Written By: Last Updated:

Chandrayaan-3 : चंद्रयान-2 ऑर्बिटरवर बसवलेल्या ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने घेतलेला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो इस्रोने आज (9 सप्टेंबर) शेअर केला आहे. हा फोटो 6 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता.

फोटोत चंद्राचा पृष्ठभाग निळा, हिरवा आणि गडद काळ्या रंगात दिसत आहे. त्याच वेळी, फोटोत पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसतो, जो विक्रम लँडर आहे. सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र आहे आणि चांद्रयान-3 ‘स्लीप मोड’मध्ये आहे.

विक्रम लँडर स्लीप मोडमध्ये
23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलेल्या अंतराळ यानाबाबत, अंतराळ संस्थेने सांगितले होते की विक्रम लँडर स्लीप मोडमध्ये सेट केले गेले आहे आणि त्याचे पेलोड्स बंद करण्यात आले आहेत. त्याच वेळी, त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज केली जाते. मात्र, त्याचा रिसीव्हर चालू ठेवण्यात आला आहे. आशा आहे की तो त्याच्या पुढील टप्पा यशस्वी सुरु करेल.

डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत ठोकले शतक, सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला

इस्रोचा हॉप प्रयोग
यापूर्वी 4 सप्टेंबर रोजी इस्रोने माहिती दिली होती की चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग बंद केल्यानंतर दोन दिवसांनी हॉप प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. “त्याने (विक्रम) इंजिन सुरू केले, अपेक्षेप्रमाणे सुमारे 40 सेमी वर उचलले आणि 30-40 सेमी अंतरावर सुरक्षितपणे उतरले,” असे अंतराळ संस्थेने सांगितले.

चांद्रयान-2 ऑर्बिटरने यापूर्वीही फोटो घेतले होते
यापूर्वी देखील 25 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-2 ने चांद्रयान-3 चे छायाचित्र घेतले होते. या चित्रात, लँडर झूम करून इनसेटमध्ये दाखवले होते. हे चित्र दोन चित्रांचे मिश्रण होते. त्याच्या एका चित्रात जागा रिकामी दाखवण्यात आली होती, तर दुसऱ्या चित्रात लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर दिसत होता.

‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी

DFSAR म्हणजे काय?
डीएफएसएआर हे विशेष प्रकारचे उपकरण आहे. हे अंधारात उच्च रिझोल्यूशन पोलरीमेट्रिक मोडमध्ये फोटो क्लिक करते. ते अंधारात धातूंमधून उत्सर्जित होणारी उष्णता आणि प्रकाश देखील कॅप्चर करते.

Tags

follow us