‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी

SL vs BAN: आशिया चषक सुपर-4 फेरीचा (Asia Cup 2023) दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. कोलंबोमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 257 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने मोठं योगदान दिले. कुसल […]

SL Vs BAN

SL Vs BAN

SL vs BAN: आशिया चषक सुपर-4 फेरीचा (Asia Cup 2023) दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. कोलंबोमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 257 धावा केल्या.

श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने मोठं योगदान दिले. कुसल मेंडिसने 73 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर सदिरा समरविक्रमाने 72 चेंडूत 93 धावा केल्या. या समरविक्रमाने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

G20 Summit : भारताने G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश कसा केला? वाचा चीनच्या अडवणुकीच्या इनसाइड स्टोरी

सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस चमकले…
श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निशांक आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. पथुम निशांकने 60 चेंडूत 40 धावा केल्या. तर दिमुथ करुणारत्नेने 17 चेंडूत 18 धावा केल्या. यानंतर कुसल मेंडिसने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, यानंतर फलंदाजीला आलेले चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दाशून शनाका झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. पण सदिरा समरविक्रमाने एक बाजू लावून धरली.

अशी झाली बांगलादेशची गोलंदाजी…
बांगलादेशकडून गोलंदाजीमध्ये हसन महमूद आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. शरीफुल इस्लामने 2 खेळाडूंना बाद केले. आता बांगलादेशसमोर सामना जिंकण्यासाठी 258 धावांचे लक्ष्य आहे.

Online Fraud: ‘या’ अभिनेत्रीविरोधात ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

शाकिब अल हसनच्या बांगलादेश संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. बांगलादेश हा सामना हरला तर ते आशिया कपमधून बाहेर पडेल. अशा प्रकारे, बांगलादेशसाठी ही करा किंवा मरो स्पर्धा आहे. यापूर्वी सुपर-4 फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता.

Exit mobile version