G20 Summit : भारताने G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश कसा केला? वाचा चीनच्या अडवणुकीच्या इनसाइड स्टोरी

  • Written By: Published:
G20 Summit : भारताने G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश कसा केला? वाचा चीनच्या अडवणुकीच्या इनसाइड स्टोरी

G-20 Summit : सध्या दिल्लीत जी-20 परिषदेची (G-20 Summit) मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरूवात करतांनाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला (African Union) G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं. भारताच्या पुढाकाराने आफ्रिकन युनियनला G20 चे 21 वे सदस्य म्हणून प्रवेश मिळाला.

भारताने या वर्षी जूनमध्ये G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याची मोहीम सुरू केली होती. यासाठी भारताने आपल्या बाजूने पुढाकार घेतला आणि सर्व सदस्य देशांची संमती घेतली आणि आफ्रिकन युनियनला G20 मध्ये स्थायी सदस्य बनवले. त्यामुळं G20 आता 21 देश आणि समूहांची संघटना बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे G20 शिखर परिषदेच्या शुभारंभप्रसंगी आफ्रिकन युनियनच्या सदस्यत्वाची घोषणा केली. त्यांनी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असौमानी यांना गटाचे स्थायी सदस्य म्हणून त्यांची जागा घेण्यासाठी पुढं आमंत्रित केले. भारताची वाढती विश्वासार्हता म्हणून याकडे पाहिले जात आहे.

G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याचा विचार पहिल्यांदा या वर्षी जूनमध्ये मांडण्यात आला होता. त्यानंतर G20 चे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांच्या नेत्यांना पत्र लिहून हा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला होता. असे सांगितले जात आहे की, या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या ‘व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ’ शिखर परिषद झाली. यात आफ्रिकन खंडातील 55 देशांपैकी बहुतेक देश सहभागी झाले होते. त्यानंतर आफ्रिनक युनियनचा समावेश जी-२० मध्ये करण्याचा विचार सुरू झाला. नंतर आफ्रिकन युनियनचे मुख्यालय असलेल्या इथिओपियातील आदिस अबाबा येथे चर्चा पुढे नेण्यात आली. आत्तापर्यंत G20 मध्ये संपूर्ण आफ्रिका खंडातून एकच सदस्य देश होता – दक्षिण आफ्रिका.

केएल राहुल पूर्णपणे फिट, पाकिस्तानविरुद्ध इशान की राहुल? रोहितसमोर पेच 

भारताच्या उपक्रमाला अमेरिका-फ्रान्सचा पाठिंबा दिला
अनेक आफ्रिकन नेत्यांचा असा विश्वास होता की युरोपचे प्रतिनिधित्व पाच देश तसेच युरोपियन युनियनद्वारे केले जाते. अशा परिस्थितीत आफ्रिकन युनियन देखील समान प्रतिनिधित्वास पात्र आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही आफ्रिकन युनियनच्या सहभागाला पाठिंबा जाहीर केला. भारताने म्हटले की हे पाऊल न्यायसंगत, निष्पक्ष, अधिक समावेशक आणि प्रशासनाच्या दिशेने एक योग्य पाऊल आहे. त.

चीन आणि रशियाचा दृष्टिकोन काय होता?
G20 चा सदस्य असल्‍याने भारताने आफ्रिकन युनियनच्‍या सदस्‍यतेसाठी चीन आणि रशियाकडेही पाठिंबा मागितला होता. यावर रशियाने तटस्थ वृत्ती दाखवून सदस्यत्वासाठी सहमती दर्शवली, मात्र चीनने आपले पत्ते उघड केले नव्हते. चीनला भीती होती की, भारत ब्रिक्समद्ये नवीन देशांचा समावेश करण्याच्या आपल्या योजनेवर पाणी फेरेल. त्यामुळं चीनने आफ्रिकन युनियनला G20 च्या सदस्यत्वापासून दूर ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. तथापि, भारताने, चीनचे मनसुबे ओळखून आणि जागतिक भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देशांच्या प्रवेशाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांनंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने G20 च्या विस्तारासाठी आपला पाठिंबा जाहीर केला.

आफ्रिकन युनियन महत्वाचे का आहे?
आफ्रिकन युनियनमध्ये एकूण 55 देश सहभागी होतात. त्यांची एकूण लोकसंख्या 1.3 अब्ज आहे. 2050 पर्यंत ही संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून एवढ्या मोठ्या गटाला G-20 चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याची मागणी होत होती आता पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube