केएल राहुल पूर्णपणे फिट, पाकिस्तानविरुद्ध इशान की राहुल? रोहितसमोर पेच

केएल राहुल पूर्णपणे फिट, पाकिस्तानविरुद्ध इशान की राहुल? रोहितसमोर पेच

Asia Cup 2023:भारताचा सलामीवीर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. साखळी फेरीतील पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. आता केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होताच, संजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. संजू सॅमसनची आशिया चषकासाठी संघात राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. पण केएल राहुल तंदुरुस्त झाल्यानंतर सॅमसन भारतात परतणार आहे.

संजू सॅमसन भारतात परतणार…
आशिया चषकासाठी निवडलेल्या 17 सदस्यीय भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला होता. मात्र, संजू सॅमसनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. केएल राहुलही पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. मात्र, आता केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे संजू सॅमसनला भारतात परतावे लागणार आहे. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल टीम इंडियामध्ये परतला आहे. आता संजू सॅमसन लवकरच भारताला रवाना होणार आहे.

Online Fraud: ‘या’ अभिनेत्रीविरोधात ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

मात्र, केएल राहुलला पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. खरे तर इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध 81 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली होती. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनला भारतीय संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असू शकते, असे मानले जात आहे. केएल राहुलपेक्षा इशान किशनला पसंती मिळू शकते. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन पाकिस्तानविरुद्ध कोणत्या खेळाडूवर सट्टा लावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube