IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! ओव्हल टेस्टमधून बुमराह बाहेर? ‘या’ खेळाडूला संधी

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! ओव्हल टेस्टमधून बुमराह बाहेर? ‘या’ खेळाडूला संधी

Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. पाचवा सामना उद्यापासून (IND vs ENG) ओव्हलमध्ये सुरू होणार आहे. क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की बीसीसीआयच्या मेडिकल टीमने बुमराहला सांगितलं की हा निर्णय त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे.

हा निर्णय अनपेक्षित नाही. कारण बुमराह इंग्लंड दौऱ्यात फक्त तीन (India vs England) सामने खेळेल असे आधीच ठरले होते. बुमराहने पहिला सामना हेडिंग्ले (लीड्स) येथे खेळला होता. दुसरा सामन्यात बुमराह नव्हता. हा सामना भारताने जिंकला होता. यानंतर लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथील दोन्ही सामन्यात बुमराह संघात होता. बुमराहने ओल्ड ट्रॅफर्डमधील सामन्याच्या चौथ्या दिवशी गोलंदाजी केली नाही. अंतिम दोन कसोटी सामन्यात तीन दिवसांचं अंतर आहे त्यामुळे मॅनेजमेंटने आधीच केलेल्या नियोजनात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG : ओव्हल कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्स बाहेर; कारण काय?

सितांशु कोटक यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार की नाही याचं उत्तर दिलं आहे. कोटक म्हणाले या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. बुमराह सध्या फीट आहे. त्याच्याकडील वर्कलोड पाहता त्याने मागील सामन्यातील एका डावात गोलंदाजी केली होती. त्यामुळे हेड कोच फिजियो आणि कर्णधार चर्चा करुन बुमराहबाबत काय तो निर्णय घेईल.

चौथ्या कसोटी सामन्यात संथ आणि सपाट खेळपट्टीसह जास्त ओव्हर टाकल्यामुळे आलेला थकवा या सगळ्यांचा परिणाम बुमराहच्या वेगावर झाला. बुमराहने 33 धावांत दोन विकेट घेतल्या. एका डावात सर्वाधिक ओव्हर बुमराहने टाकल्या होत्या. या दरम्यान त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी 100 धावा घेतल्या. या मालिकेदरम्यान बुमराहच्या वेगवान चेंडूंची संख्या सातत्याने कमी होत गेली. हेडिंग्लेतील पहिल्या सामन्यात त्याने 42.7 टक्के वेगवान चेंडू फेकले होते. लॉर्ड्समध्ये 22.3 टक्के आणि ओल्ड ट्रॅफर्डमध्ये बुमराहने फक्त 0.5 टक्के वेगवान चेंडू फेकले.

इंडियन चॅम्पियन संघाचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, सेमीफायनल होणार की नाही?

बुमराहच्या जागी कुणाला संधी

जर बुमराह या कसोटीत खेळला नाही तर त्याच्या जागी अन्य खेळाडू घ्यावा लागणार आहे. यात आकाशदीपचं नाव आघाडीवर आहे. कदाचित तो या सामन्यात खेळू शकतो. मंगळवारी टीम इंडियाच्या ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनमध्येच याचे संकेत मिळाले होते. आकाशदीप चौथा कसोटी सामना दुखापतीच्या कारणामुळे खेळू शकला नव्हता. परंतु, आता तो फिट आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याला बुमराहच्या जागी संधी मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube