Download App

डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत ठोकले शतक, सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला

David Warner : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वे शतक होते, तर वॉर्नरने दक्षिण अफ्रीकाविरुद्ध एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 5 वे शतक झळकावले आहे.

पहिल्या सामन्यात वॉर्नर शून्यावर बाद झाला होता, मात्र या सामन्यात त्याने आपली पूर्वीची कामगिरी मागे टाकून शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावण्यात यश मिळवले. या सामन्यात त्याने आपला सहकारी सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडसोबत शतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहासही रचला.

डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत शतक झळकावले
डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 85 चेंडूत शतक झळकावले आणि हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 20 वे शतक ठरले. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 12 चौकारांसह आपले शतक पूर्ण केले. अलीकडच्या काळात खराब फॉर्मशी झगडत असलेला वॉर्नर विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परतणे कांगारू संघासाठी चांगले संकेत आहेत. 36 वर्षीय वॉर्नरचा कदाचित हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असणार आहे.

काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?

वॉर्नरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
डेव्हिड वॉर्नरने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 46 वे शतक ठोकले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45 शतके झळकावली होती, तर ख्रिस गेल 42 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकली
46 – डेव्हिड वॉर्नर
45 – सचिन तेंडुलकर
42 – ख्रिस गेल
41- सनथ जयसूर्या
40 – मॅथ्यू हेडन
39 – रोहित शर्मा
37 – स्टीव्ह स्मिथ

‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल

वॉर्नरने सलामीवीर म्हणून 6000 धावा पूर्ण केल्या
या खेळीदरम्यान डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 6000 धावा पूर्ण केल्या. त्याने हा पराक्रम 140 डावांमध्ये केला, तर पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने 121 डावांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून 6000 धावा पूर्ण केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर धवनसोबत चौथ्या स्थानावर आहे.

सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारे फलंदाज
121 डाव – रोहित शर्मा
123 डाव – हाशिम आमला
133 डाव – सचिन तेंडुलकर
140 डाव – डेव्हिड वॉर्नर
140 डाव – शिखर धवन
143 डाव – सौरव गांगुली

Tags

follow us