Download App

Chandrayaan 3 Landing : दही अन् साखरेचा फोटो ट्विट करुन झोमॅटोकडूनही शुभेच्छा!

Chandrayaan 3 Landing : सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या चांद्रयान -3 चंद्रावर लॅंडिंग करणार आहे. चांद्रयान -3 च्या यशस्वी लॅंडिंगसाठी देशभरासह जगभरातून अनेक नागरिकांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे. अशातच आता फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोनेही भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या असून यासंदर्भातील झोमॅटोकडून ट्विट करण्यात आलं आहे.

भारतात दही आणि साखरेला विशेष महत्व आहे. दही साखर शुभ मानलं जातं. त्यामुळे झोमॅटोने ट्विटरमध्ये दही आणि साखरेचा फोटो पोस्ट करीत “प्रिय इस्रो आज चांद्रयान -3 लँडिंगसाठी सर्व शुभेच्छा,” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

Censor Board Certificate: खिलाडीनंतर किंग खानच्या ‘जवान’ला कात्री?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल

भारतासाठी आजचा महत्वपूर्ण दिवस मानला जात आहे, कारण आज भारताचा तिरंगा झेंडा थेट चंद्रावर फडकवण्यात येणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रावर पाठवण्यात आलं आहे. अखेर आज हे चांद्रयान चंद्रावर लॅंड होणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे चांद्रयान लॅंडिंग होणार आहे.

Onion Price : दोन दिवसांचाच कांदा खरेदी कराल; उर्वरित कांद्याचे करायचे काय? तुपकरांचा सरकारला सवाल

दरम्यान, चांद्रयान-3, सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग सुरक्षित पद्धतीने करण्याचा ‘इस्रो’ला पूर्ण विश्वास आहे. भारताच्या या मिशनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. ‘चांद्रयान-3’च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारत जगात रशिया, अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने येणार आहे. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

Tags

follow us