Censor Board Certificate: खिलाडीनंतर किंग खानच्या ‘जवान’ला कात्री?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल
Jawan Censor Board Certificate: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराचा (Nayantara) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता लागली आहे. प्रकाशझोतात राहिलेल्या जवानला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जवानला सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.
अखेर सेन्सॉर बोर्डाकडून ‘जवान’ला U/A प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ७ महत्त्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी देण्यात आली आहे. ‘जवान’ची धावण्याची वेळ साधारण १६९.१८ मिनिटे आहे. U/A प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा बघू शकणार आहेत. परंतु हा सिनेमा १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा सिनेमा पालकांबरोबर बघणे आवश्यक ठरणार आहे.
#Jawan Censor Certificate , Censor Cuts And Runtime details.
7 modification done to last print pic.twitter.com/b4R7Y8uq09— Azam Sajjad (@AzamDON) August 22, 2023
तसेच सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना जवळपास ७ सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर सेन्सॉर बोर्डाने खिलाडीच्या ‘OMG 2’ला २७ कट्सला कात्री लावल्याचे बघायला मिळाले आहे. हे कट्स सुनावल्यामुळे निर्माते सेन्सॉर बोर्डवर नाराज झाल्याचे दिसून आले.
View this post on Instagram
किंग खानचा ‘जवान’ सिनेमा जवळपास १६९. १८ मिनिट अर्थात अडीच तासांचा हा सिनेमा आहे. जवानच्या सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेटची प्रिंट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सेन्सॉरने सुचवलेल्या या बदलात सिनेमातील संवाद आणि हिंसक दृश्यांचा समावेश आहे. सिनेमात दाखवलेल्या या दृश्यांमध्ये किंग खान या सिनेमाच्या माध्यमातून धमाकेदार पुनरागमन करणार आहे, असे दाखवण्यात आले आहे. आत्महत्येच्या सीनमध्ये बदल सुचवण्यात आला आहे. या सिनेमाचा एकूण वेळ देखील कमी करण्यात आला आहे.
Bharat Jadhav: गलगले निघाले ‘स्कॅम 2003’ सीरिजचा दमदार ट्रेलर पाहिलात का?
सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन ॲटली यांनी केले आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये किंग खान सोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा सोबतच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा येत्या ७ सप्टेंबरला सिनेमामध्ये प्रदर्शित होणार आहे.