Download App

Chandrayaan 3 Moonquake: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ‘विक्रम’ने लावला शोध; भूकंपासारख्या..,

Image Credit: letsupp

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भूकंपासारख्या नैसर्गिक हालचालींचा शोध चांद्रयान-3 च्या विक्रमने लावला असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. ही नैसर्गिक हालचाल भूकंपासारखीच आहे की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचंही इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे. चंद्रावर लॅंड झाल्यापासून चांद्रयान-3 यशस्वीपणे विविध प्रयोग करीत आहे.

दरम्यान, विक्रम लँडरला चंद्रावर “नैसर्गिक” भूकंपासारखी घटना आढळून आली असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले. इस्रोला चंद्रावर भूकंपासारख्या नैसर्गिक हालचाली शोधल्याची माहिती मिळाली खरी पण चंद्राच्या भूमीवरून येणारी ही माहिती खरोखरच भूकंपाची आहे की आणखी काही याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडने एक घटना नोंदवली आहे जी नैसर्गिक घटनेशी किरकोळ साम्य असल्याचे दिसते. ILSA चे प्राथमिक उद्दिष्ट नैसर्गिक भूकंप, प्रभाव आणि कृत्रिम घटनांमुळे निर्माण होणारे भूकंप मोजणे हे आहे.

Jawan Trailer: ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’ शाहरूखचं मुलाच्या केसप्रकरणी वानखेडेंना उत्तर? नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव

25 ऑगस्ट 2023 रोजी रोव्हरच्या नेव्हिगेशन दरम्यान रेकॉर्ड केलेली माहिती इस्रोने आलेखात दर्शविली आहेत. याव्यतिरिक्त, 26 ऑगस्ट रोजी रेकॉर्ड केलेली नैसर्गिक वाटणारी घटना देखील दर्शविली आहे. या घटनेचा स्रोत इस्रो सध्या तपासात आहे. इस्त्रो सर्व स्त्रोतांचा तपास करत असून अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) उपकरणाने ऑक्सिजन तसेच चंद्रावरील इतर काही लहान घटकांचा शोध घेतल्याची माहिती इस्रोने दिली.

दरम्यान, विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे आणि विविध माहिती गोळा करत आहे. सध्या चांद्रयान 3 मोहिमेत भारताला चंद्रावर ऑक्सिजन (oxygen) आढळून आलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येत संशोधन सुरू केले. आता चांद्रयान-3 बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चांद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरला संशोधनाच्या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचेही इस्रोने म्हटले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज