Jawan Trailer: ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’ शाहरूखचं मुलाच्या केसप्रकरणी वानखेडेंना उत्तर? नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव

Jawan Trailer: ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’ शाहरूखचं मुलाच्या केसप्रकरणी वानखेडेंना उत्तर? नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव

Jawan Trailer : अभिनेता किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान हा वेगवेगळ्या लूक्समध्ये आणि डॉयलॉगबाजी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानचे चाहते जवान या सिनेमाच्या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते. त्यामुळे ट्रेलर लॉन्च करताच सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यात एका डायलॉगमधून शाहरूख आणि क्रूज प्रकरणी मुलगा आर्यनवरील अन्यायाचा बदला घेतल्याचं बोललं जात आहे.

इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोननंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन

काय आहे हा डायलॉग?

जवान सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात “एक राजा था एक के बाद एक जंग हारता गया” या डायलॉगनं होते. तसेच ट्रेलरमध्ये काही अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहे. जवान सिनेमाच्या ट्रेलरमध्ये किंग खानसोबतच अभिनेता विजय सेतूपती, दीपिका पादुकोण आणि नयनतारा यांची देखील झलक बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या शेवटी ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा डायलॉग शाहरूखच्या तोंडी आहे. त्यामुळे या डायलॉगने नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष वेधलं. त्यामुळेच सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या डायलॉगमधून शाहरूख आणि क्रूज प्रकरणी मुलगा आर्यनवरील अन्यायाचा बदला घेतल्याचं बोललं जात आहे.

Letsupp Special : रोहित पवार राष्ट्रवादीत अजितदादांची जागा घेत आहेत का?

काय आहे आर्यन खान क्रूज प्रकरण?

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये क्रूज प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो तबेबल 26 दिवस तो जेलमध्ये देखील होता. एका पार्टीवर छापा टाकल्यानंतर आर्यन त्या पार्टीमध्ये सापडला होता. त्यावेळी एसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे ती केस होती. त्यावेळी त्यामध्ये या प्रकरणाला विविध राजकीय आणि गुन्हेगारीचे वलय निर्माण झाले होते. त्यात शाहरूखचं सगळ कुटुंब विस्कळीत झालं होतं. सर्वांची चौकशी होत होती.

दरम्यान त्यानंतर आर्यन खानला अटक झाल्यावर २५ कोटींची मागणी करून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे वानखेडे-शाहरूखमधील चॅटिंग उघड झाले होते. त्यांतर वानखेडेंना त्या पदावरून काढण्यात आलं. आता त्यांची बदली चेन्नईला करण्यात आली आहे.

दुसरीकडे आर्यन खानवर क्रूज प्रकरणी करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे आता जवान सिनेमाच्या ट्रेलर रिलीजनंतर ट्रेलरच्या शेवटी ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा डायलॉग शाहरूखच्या तोंडी आहे. या डायलॉगमधून शाहरूख आणि क्रूज प्रकरणी मुलगा आर्यनवरील अन्यायाचा बदला घेतल्याचं बोललं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube