Download App

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  भारताच्या अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्राच्या साऊत पोलवर जाणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. त्यानंतर जगभरात भारताचे कौतुक झाले आहे. दरम्यान, चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता भारताच्या हाती आणखी मोठं यश लागलं. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे आणि विविध माहिती गोळा करत आहे. सध्या चांद्रयान 3 मोहिमेत भारताला चंद्रावर ऑक्सिजन (oxygen) आढळून आलं.

विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येत संशोधन सुरू केले. आता चांद्रयान-3 बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चांद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरला संशोधनाच्या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; परीक्षांच्या फीबाबत केली मोठी मागणी 

ISRO कडून याबाबत अधिकृत ट्विट करण्यात आलं. त्यात सांगिलतं की, रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची पुष्टी केली आहे. Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O (ऑक्सिजन) देखील आढळले आहेत.

पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जाणं गरजेचं होते, त्यामुळं भारताने चांद्रयान-2 मोहित आखली होती. मात्र, दुर्दैवीनं इस्त्रोची ही चांद्रयान-2 मोहीम चंद्रावर सॉप्ट लॅंड करण्यात अपशस्वी झाली होती. त्यानंतर शास्त्रज्ञांनी पुन्हा चांद्रयान मोहिमेसाठी कठोर परिश्रम घेतले आणि चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरले होते. त्यानंतर चंद्रावर ऑक्सीजन आढळले आहे.

दरम्यान, मानवाला पृथ्वीवर राहण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. आता जेव्हा तेच चंद्रावर सापडले आहे, तेव्हा भारताच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

Tags

follow us