Chandrayan 3 Landing : सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कसे, केव्हा आणि कोठे पाहता येणार?

Chandrayan 3 Soft Landing : भारताचं चांद्रयान 3 चं आज (दि.23) संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या मोहिमेकडे भारतातील करोडो देशवासियांशिवाय संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच आतुर असून, याचे प्रेक्षेपण केव्हा आणि कुठे बघता येणार हे आपण जाणून घेऊया. (Chandrayan 3 Live Striming ) कधी होणार सॉफ्ट लँडिंग […]

Letsupp Image   2023 08 23T112520.124

Letsupp Image 2023 08 23T112520.124

Chandrayan 3 Soft Landing : भारताचं चांद्रयान 3 चं आज (दि.23) संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या मोहिमेकडे भारतातील करोडो देशवासियांशिवाय संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच आतुर असून, याचे प्रेक्षेपण केव्हा आणि कुठे बघता येणार हे आपण जाणून घेऊया. (Chandrayan 3 Live Striming )

कधी होणार सॉफ्ट लँडिंग

चांद्रायान 3 चे सॉफ्ट लँडिंग आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी ६.०४ मिनिटांनी होणार असल्याचे इस्रोने सांगितले आहे. त्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्याचे निर्धारित काम सुरू करेल. चांद्रयानचे लँडिंग यशस्वी झाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर उतरणारा जगातील पहिला देश बनेल.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?

अशा आहेत सॉफ्ट लँडिंगच्या स्टेप्स

पहिली स्टेप : या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किमीवरून 7.5 किमीपर्यंत कमी केले जाईल.

दुसरी स्टेप : यामध्ये भूपृष्ठापासूनचे अंतर 6.8 किमी पर्यंत आणले जाईल. या टप्प्यापर्यंत यानाचा वेग 350 मीटर प्रति सेकंद असेल, म्हणजेच सुरुवातीच्या तुलनेत साडेचार पट कमी असेल.

तिसरी स्टेप : यात यान चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 800 मीटर उंचीवर आणले जाईल. येथून दोन थ्रस्टर इंजिन टेक ऑफ करतील. या टप्प्यात यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या अगदी जवळ पोहोचेल.

चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्याने टिपले चंद्राचे अदभूत फोटो, इस्रोने शेअर केला व्हिडिओ

चौथी स्टेप : या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या 150 मीटर जवळ आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट असे म्हणतात. म्हणजेच व्हर्टिकल लँडिंग.

पाचवी स्टेप : या स्टेपमध्ये ऑनबोर्ड सेन्सर्स आणि कॅमेर्‍यांचे थेट इनपुट आधीपासूनच संग्रहित संदर्भ डेटाशी जोडले जातील. या डेटामध्ये 3,900 छायाचित्रे समाविष्ट आहेत. जी चांद्रयान 3 च्या लँडिंग साइटची आहेत. या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या 60 मीटरच्या जवळ आणले जाईल.

सहावी स्टेप : लँडिंगचा हा शेवटचा टप्पा आहे, ज्यामध्ये लँडर थेट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल.

Chandrayaan 3 : आज चंद्रावर उतरणार चंद्रयान; रशियाचं मिशन फेल गेल्यानंतर इस्त्रोने घेतला ‘हा’ निर्णय

चांद्रयान-३ चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे?

इतिहासात नोंद होणाऱ्या या क्षणाचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट 2023 रोजी IST संध्याकाळी 17:20 वाजता सुरू होणार आहे. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग इस्त्रोकडून त्यांच्या फेसबुक पेज आणि युट्यूबवरून केले जाणार आहे. याशिवाय डीडी नॅशनलसह अन्य प्लॅटफॉर्मवरही याचे ते थेट पाहता येईल. याशिवाय इस्त्रोची अधिकृत वेबसाईट https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html यावरही याचे थेट प्रेक्षेपण पाहता येणार आहे.

Exit mobile version