चेन्नई : आत्महत्या केलेल्या पोटच्या मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एस जेगेश्वरन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थाचे नाव आहे. दुसरीकडे, चेन्नईतील या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पिता-पुत्राच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना आत्मविश्वास जपत जीवन जगण्याचे आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले आहे.
Prithviraj Chavan यांना मुख्यमंत्री असताना राज्यात काय चाललंय कळालं नाही; खासदार विखेंची बोचरी टीका
याबाबत अधिक माहिती अशी की, एस जगदीश्वरन गेल्या दोन वर्षांपासून NEET परीक्षा देत होता. मात्र, यात त्याला यश मिळत नव्हते. सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे एस जेगेश्वरनला नैराश्य आले होते. जगदीश्वरन हा 12 ऑगस्ट रोजी शहरातील क्रोमपेट परिसरात त्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जगदीश्वरनवर अंत्यसंस्कार केल्यानंतर जगदीश्वरन वडील सेल्वासेकर यांनी दोन दिवसांनंतर (रविवारी) गळफास घेत जीवन संपवले. सेल्वासेकर हे छायाचित्रकार म्हणून काम करत होते.
Tamil Nadu CM MK Stalin writes, "…I was shocked to know that Jegadeeswaran from Chromepet, who was a NEET aspirant, committed suicide. When I was thinking of how to console his parents, the next day his father Selvasekar also died by suicide. I don't know how to console… pic.twitter.com/0jZseTEdOL
— ANI (@ANI) August 14, 2023
19 वर्षीय एस जगदीश्वरनने 2022 मध्ये बारावी पूर्ण केली होती. तेव्हापासून तो दोनवेळा NEET परिक्षा दिली होती. परंतु, यात त्याला यश मिळाले नाही. याच नैराश्येतून त्याने 12 ऑगस्ट रोजी घरात एकटा असताना गळफास घेत जीवन संपवले. मुलाचे असे अकाली जाण्याचे दु:ख सहन न झाल्याने सेल्वासेकर यांनी रविवारी गळफास लावून त्यांचे जीवन संपवले.
CM Eknath shinde आजारी असल्याचे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपचा डाव
जगदीश्वरनने 12वीत 427 गुण मिळवले होते. पण NEET परीक्षेत दोनदा नापास झाल्याने तो नैराश्येत होता. पोलिस तपासात जगदीश्वरन यांच्या खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मात्र, वडील सेल्वासेकर यांनी मुलाच्या मृत्यूसाठी NEET परीक्षेला जबाबदार धरले होते.