Chhattisgarh News : छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले. ही घटना बिजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात घडली. या कारवाईत आतापर्यंत 31 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर दोन जवान शहीद झाले आहेत. दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या जवानांचे संयु्क्त पथक आणि नक्षलवाद्यांत रविवारी सकाळपासून चकमक सुरू होती.
तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो; पुन्हा चळवळीत गेलो तर गोळ्या घालेन, असं का म्हणाले गडकरी?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरातील जंगलात नक्षलवादी आहेत अशी गुप्त माहिती होती. यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने मोहीम हाती घेतली. या शोध मोहिमेत आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
बीजापूर-नारायणपूर सीमेवर रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवद्यांत चकमक झाली. या चकमकीत डीआरजी, एसटीएफ आणि महाराष्ट्राच्या सी 60 दलाचे जवान सहभागी होते. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून अॅटोमॅटिक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Chhattisgarh: 12 Naxalites killed in an encounter with security forces in the forests under the National Park area of District Bijapur. Search operation is going on: Bastar Police pic.twitter.com/3Sgy8GVlcj
— ANI (@ANI) February 9, 2025
ज्या भागात ही चकमक झाली तो परिसर बीजापूर जिल्ह्यातील फरसेगढ म्हणून ओळखला जातो. येथील नॅशनल पार्क परिसरात नक्षलवादी सक्रिय आहेत. याच भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. डीआरजी, एसटीएफ आणि महाराष्ट्र सी 60 दलाच्या जवानांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात चार जवान जखमी झाले. यातील दोघे नंतर शहीद झाले. बाकीच्या दोघांनी तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले.