Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची (Chhattisgarh Assembly Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेही प्रचारासाठी दोन दिवसांच्या छत्तीसगडला दौऱ्यावर आलेत. शनिवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला. मोदींनी प्रत्येक बँक खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासनं दिलं, परंतु त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, असं म्हणत टीका केली. यावेळी त्यांनी छत्तीसगडसाठी अनेक मोठ्य मोठ्या घोषणा केल्या.
MPSC Recruitment 2023: एमपीएससी अंतर्गत प्राचार्य, अनुवादक पदांची भरती, या ताऱखेपर्यंत करा अर्ज
छत्तीसगडमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल. तेंदूपत्त्याला प्रति वर्ष प्रति मानक बॅग 4000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळेल, या घोषणा राहुल गांधींनी केल्या.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तरुणांना रोजगार देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी खोटी आश्वासनं दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हा चुनावी जुमला होता, असं भाजपने सांगितलं. मात्र, काँग्रेसचे सरकार स्थापन होताच आम्ही अवघ्या दोन तासांत 19 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. 1700 आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे दिले. तेंदूपत्ता 4000 रुपये प्रति पिशवी दराने खरेदी केला जात आहे.
ते म्हणाले, आम्ही छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना धानासाठी 2500 रुपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 2640 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ
राहुल म्हणाले की, गेल्या वेळी आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत बोललो होतो, पण भाजपने एक-दोन वर्षांत असे होणार नाही, असे सांगितले, पण पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. याचा फायदा राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना झाला. आम्ही 10,000 कोटी रुपयांची कर्जे माफ केली आणि मी पुन्हा तेच आश्वासन देत आहोत. किसान न्याय योजनेअंतर्गत 26 लाख शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे राहुल गांधींनी सांगिलतं.
केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला संबोधित करताना राहुल यांनी आणखी काही घोषणा केल्या. ते म्हणाले की, छत्तीसगडमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल.
राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
राहुल गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. जनता गरीब आहे मात्र, भाजप अदानीला मदत करते. केंद्र सरकार अदानींना सगळंचं देत आहे. भाजप सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे. काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा भाजपवाल्यांना पोटात दुखत होते. आदिवासींची एक लाख एकर जमीन हिसकावून घेण्याचे काम रमण सरकारने केले. रमण सरकारला 15 वर्षांत पेसा कायदाही लागू करता आला नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली.