Download App

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

  • Written By: Last Updated:

Who is Will beceme CM in Chhattisgarh?: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Assembly Elections) दोन टप्प्यात मतदान झाले असून आता एक्सिट पोल समोर आलेत. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. दरम्यान, एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपलाच पक्ष सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत. असं असलं तरी खरं चित्र ३ डिसेंबरला समोर येईल. त्याआधी राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

अमित शाह ठरले फेल, छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचीच मुसंडी? एक्झिट पोलची आकडेवारी समोर 

2018 मध्ये भाजपचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा जाहीर केलेला नाही. त्याचवेळी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता. पण, प्रचारादरम्यान भूपेश बघेल यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी 72 निवडणूक सभा घेऊन राज्य पिंजून काढलं.

काँग्रेसमधील चेहरे कोण आहेत?

हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे. पण, दाव्यानुसार काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास भूपेश बघेल मुख्यमंत्री होऊ शकतात. बघेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना 2018 च्या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं त्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदी बसलवलं. त्यांनी छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील 15 वर्षांची भाजपची सत्ता उलथून टाकली होती. दरम्यान, गेल्या गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. ईडीची कारवाई असो, भाजपचे भ्रष्टाचाराचे आरोप असोत… मीडियाला सामोरे जाताना बघेल कधीही मागे हटले नाहीत.

Exit Poll 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर; सहापैकी या एक्झिट पोलने दिली बरोबरीची आकडेवारी 

बंघेल यांच्याशिवाय टीएस सिंहदेव मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. 70 वर्षीय टीएस सिंह देव हे मागच्या 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहेत. देव यांचे कुटुंबही स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. 2018 च्या विजयाचे श्रेय बघेल यांच्यासह दिले जाते. 2018 मध्ये सिंग देव हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, मात्र मुख्यमंत्रीपद बघेल यांना मिळेल. देव यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं देव यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चा आहे.

दरम्यान, बघेल आणि देव यांच्यात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाचाही प्रस्ताव येऊ शकतो. आदिवसाी चेहरा म्हणून कॉंग्रेसकडून दीपक बैज यांनाही पुढं केलं जाऊ शकतं. विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांनाही संधी मिळू शकते.

भाजपमधील चेहरे कोण आहेत?

गेल्या काही वर्षांत भाजपमधून अनेक चेहरे समोर आले आहेत. डॉ. रमण सिंह हे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे भाजपची सत्ता आल्यास त्यांना मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी चेहरा म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव आणि खासदार विजय बघेल हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

 

Tags

follow us