Download App

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शेअर बाजारातील तेजीबद्दल व्यक्त केली चिंता, सेबीला केल्या विशेष सूचना

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. त्यावर आता भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे.

Image Credit: Letsupp

CJI on Share Market : गेल्या एका महिन्यात सेन्सेक्सने 10 हजार अंकांची जबरदस्त झेप घेतली आहे.(CJI) देशांतर्गत शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. या विक्रमी तेजीमुळे (Share Market) बाजारातील गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी कमाई होत असून ते चांगले आनंदी आहेत. मात्र, बाजारातील ही तेजी काहींना घाबरवणारीही आहे.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी शेअर बाजाराच्या या विक्रमी तेजीवर चिंता व्यक्त केली. (BSE)सेन्सेक्स 80 हजार झाल्याच्या काही बातम्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, हीच सावध राहण्याची वेळ आहे. विशेषत: या बाजार तेजीत, बाजार नियामक सेबी आणि सॅट (सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण) यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

योग्य ती काळजी घ्यावी विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट

सरन्यायाधीश चंद्रचूड काल( SAT)च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करत होते. त्यावेळी त्यांनी शेअर बाजारातील तेजीवर भाष्य केलं. ते म्हणाले, BSE ने 80 हजारांचा टप्पा ओलांडणं हा एक उत्साहवर्धक क्षण आहे, कारण त्यासोबत भारत एका नव्या युगात प्रवेश करत आहे. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणूकदार मोठा पैसा टाकत आहेत. याच कारणामुळे सरन्यायाधीश धनंजचय चंद्रचूड यांनी भारतीय भांडवली बाजार नियामक सेबी आणि सिक्युरिटिज अपिलेट ट्रिब्यूनलला महत्त्वाची सूचना केली आहे. अशा स्थितीत या दोन्ही संस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

या संस्थांवर मोठी जबाबदारी

‘सेबी आणि सॅट यासारख्या नियामक संस्थांवर खूप मोठी जबाबदारी आहे. गुंतवणुकीसाठई स्थिर आणि विश्वसनीय वातावरण तयार करण्यात या संस्थांना राष्ट्रीय महत्त्व आहे. कायद्याच्या मदतीने आमची गुंतवणूक सुरक्षित आहे, असा विश्वास जेव्हा लोकांना येईल तसंच वादविवादाचे समाधान करण्यासाठी प्रभावी तंत्र उपलब्ध असेल तर भविष्यातही गुंतवणूक वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीत असा दृष्टीकोन ठेवल्यास आर्थिक तेजी पाहायला मिळू शकते. यामुळे संपत्ती निर्मिती, रोजगार, तसंच संपूर्ण आर्थिक विकासात वाढ शक्य होईल असंही यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

आव्हनांना तोंड द्याव लागेल stock market: शेअर बाजाराची आज नवी उसळी; सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

सिक्योरिटिज अपिलेट ट्रिब्यूनल एका पंचाची भूमिका पार पडते. वित्तीय क्षेत्रातील सर्वांनी नियमांचं पालन करावं, यासाठी ही संस्था प्रयत्न करते. आपला बाजार आणि व्यवसाय अधिक किचकट झाले आहेत. नव्या नियमांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या ट्रिब्यूनलला आव्हनांना तोंड देण्यासाठी स्वत:ला तयार ठेवावं लागेल, असा सल्लाही चंद्रचूड यांनी दिला.

follow us

वेब स्टोरीज